मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या अभिनेत्रीने सोडली Ajun hi Barsat Ahe मालिका; आता साकारणार नवी भूमिका

या अभिनेत्रीने सोडली Ajun hi Barsat Ahe मालिका; आता साकारणार नवी भूमिका

अजूनही बरसात आहे (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत आता ही अभिनेत्री दिसणार नाही.

अजूनही बरसात आहे (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत आता ही अभिनेत्री दिसणार नाही.

अजूनही बरसात आहे (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत आता ही अभिनेत्री दिसणार नाही.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर :  सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे (Ajun hi Barsat Ahe ) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे (Mukta barve) आणि उमेश कामत (Umesh kamat) यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. मालिकेतील या दोघांची जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. या दोघांसोबत मालिकेतील इतर कलाकांराचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडली आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे उमा सरदेशमुख (Uma Sardeshmukh )आहे. उमा सरदेशमुख अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजच्या आईची भूमिका साकारत आहेत. उमा सरदेशमुख यांनी या मालिकेत साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. आता त्या नव्या मालिकेत एक नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे अजूनही बरसात आहे या मालिकेत त्या अभिनेत्रीने ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे.

उमा सरदेशमुख या नव्याने सुरू झालेली मराठी वाहिनी सन मराठीवरील कन्यादान (kanyadaan ) या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या कन्यादान मालिकेतील भूमिकेचे नाव आशालता आहे. “आजपर्यंत माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत, आता येते आणखी एका नवीन भूमिकेत…आशालता…एक वेगळी भूमिका एक वेगळा अनुभव. “कन्यादान” आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता नक्की बघा…” असे त्यांनी आपल्या नव्या भूमिकेबाबत सांगितले आहे. त्यामुळे उमा सरदेशमुख आता अजूनही बरसात आहे या मालिकेतून काही काळासाठी तरी ब्रेक घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा Social mediaला रामराम; शेवटची पोस्ट करत सांगितलं कारण

अजूनही बरसात आहे मालिकेत सध्या मनू आणि मल्हारचे लग्न झाले आहे आणि आता आदिराजच्या घरातले त्याच्या लग्नासाठी मागे लागले आहेत. मीराने अद्याप आदिराजला लग्नासाठी होकार दिलेला नाही. आदिराजच्या आईला त्याचे लग्न मीराशी व्हावे असे वाटते आहे. तर त्याच्या वडिलांना त्यांनी ठरवेल्या मुलीशी लग्न व्हावे असे वाटत आहे. मीराच्या मागे लग्नासाठी निखिल लागला आहे. तर तिच्या घरातल्यांनाही निखिलचे स्थळ आवडले आहे. त्यामुळे आता मीरा आणि आदिराजचे लग्न होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत FINAL TWIST; अखेर स्वीटूसमोर येणार सत्य, मात्र ओमने घेतला 'हा' निर्णय

'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या मालिकेतील या दोघांच्यातील वाद तर कधी प्रेम पाहायला प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या दोघांनी एकत्र यावे, लवकर लग्नगाठ बांधावी अशीच चाहत्यांची इच्छा आहे. तब्बल आठ वर्षानी या मालिकेच्या माध्यमातून उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोघांनी यापूर्वीचित्रपटांबरोबरच नाटकांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. लग्न पाहावे करून या चित्रपटात देखील मुक्ता आणि उमेश यांनी एकत्र काम केलं आहे. आता या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials