Home /News /entertainment /

'मन उडू उडू झालं' फेम Ajinkya Raut नं बंद केलं Instagram, समोर आलं मोठं कारण

'मन उडू उडू झालं' फेम Ajinkya Raut नं बंद केलं Instagram, समोर आलं मोठं कारण

अजिंक्य राऊत नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याच प्रयत्न करतो. पण आता पुढचे काही दिवस अंजिक्य सोशल मीडिया म्हणजे इन्स्टाग्रामवर दिसणार नाही.

    मुंबई, 17 मे- झी मरीठीवरी मन उडू उडू झालं  (Mann Udu Udu Zala ) ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दीपाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. मालिकेत इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत ( Ajinkya Raut)   साकारताना दिसतो. अंजिक्य सोशल मीडियावर नेहमी अक्टीव्ह असतो. रिल्स, व्हिडिओ, मालिकेतील ऑफस्क्रिन धमाल व्हिडिओ तो शेअर करत असतो. तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याच प्रयत्न करतो. पण आता पुढचे काही दिवस अंजिक्य सोशल मीडिया म्हणजे इन्स्टाग्रामवर  ( Ajinkya Raut Instagram hacked ) दिसणार नाही. त्याला कारणही तसं आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांचे इन्स्टा अंकाऊट हॅक झाले आहेत. आता हा फटका अजिंक्य राऊत यालाही बसला आहे. अजिंक्यचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हॅकर्सने ताबा मिळवला आहे. ही गोष्ट लक्षात येताच अजिंक्यने त्याचे पेज डिअक्टीव्ह केलं आहे. यासंबंधी ई टाईम्सने देखील वृत्त दिलं आहे. वाचा-'सभा करायच्याच तर अयोध्येत करून दाखवा, पुण्यात..' दीपाली यांचा राज ठाकरेंना टोला अजिंक्य राऊतनेही याला दुजोरा दिला असून सध्या तरी त्याने त्याचे इन्स्टा अंकाऊट बंद केले आहे. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर या भूमिकेमुळे अजिंक्य घराघरात पोहोचला आहे.या मालिकेत त्याची हृता दुर्गुळेसोबतची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. वाचा-'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस सध्या या मालिकेत इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. मालिकेतील ही जोडी सोशल मीडियावर अनेक रिल्स बनवून लक्ष वेधून घेत असते. अजिंक्यही त्याचे पर्सनल फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. पण आता त्याचे इन्स्टा अंकाऊट हॅक झाल्याने तो सोशल मीडियावरील काही दिवस तरी दिसणार नाही.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या