बॉलिवूड अभिनेत्याने Tik Tok वर बनवला वादग्रस्त Video, मुंबई पोलिसांनी केलं अटक

बॉलिवूड अभिनेत्याने Tik Tok वर बनवला वादग्रस्त Video, मुंबई पोलिसांनी केलं अटक

टीक टॉकच्या 07 ग्रुपने तबरेज अन्सारीच्या मॉब लिंचिंग प्रकरणाशी निगडीत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप घेतला.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै- बॉलिवूड अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. एजाजवर टीक टॉक स्टार फैजूच्या समर्थनात व्हिडिओ केल्याचा आरोप आहे. मॉब लिंचिंगशी निगडीत हे प्रकरण आहे. टीक टॉकच्या 07 ग्रुपने तबरेज अन्सारीच्या मॉब लिंचिंग प्रकरणाशी निगडीत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप घेतला. यात टीक- टॉक स्टार फैजूवरही कारवाई करण्यात येणार आहे.

दोन समुदायांना भडकवण्याचा गुन्हा दाखल- एजाज खानवर धर्माच्या नावाखाली दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणं आणि समुदायाला भडकवण्यासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिक- टॉक स्टार फैजूचं केलं समर्थन- दरम्यान, एजाज खानने फैजूचं समर्थन करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला. याच व्हिडिओवरून मुंबई पोलिसांनी एजाजला अटक केली. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एजाजची चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्याच्यावर इंडियन पिनल कोड आणि आयटी अॅक्ट 67 अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून यात त्याला तुरुंगवास आणि/ किंवा 5 लाख रुपयांचा दंड भरावाला लागू शकतो.

एजाजने त्याच्या व्हिडिओमध्ये बॉलिवूड सिनेमांतील काही डायलॉगची मिमिक्री करत मुंबई पोलिसांची थट्टा उडवली आहे. यासोबतच तो सात आरोपींसोबत दिसला ज्यांनी टीक टॉकवर तबरेज अन्सारीच्या लिंचिंगनंतर व्हिडिओ बनवले. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले की, जर कोणी मुस्लिम दहशतवादी होतो तर त्यात त्याचा दोष नाही.

सतत वादांमध्ये अडकतो एजाज खान, आतापर्यंत तीनवेळा गेला तुरुंगात-

याआधी बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता एजाज खानला अमली पदार्थांच्या प्रकरणी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स सेलने एजाजची चौकशी केल्याचं नवी मुंबई पोलिसांनी सांगितले होते. एजाजकडे अमली पदार्थांच्या आठ गोळ्या सापडल्या होत्या. याआधी 2016 मध्ये हेअर स्टायलिस्टला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्याप्रकरणीही त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला 10 हजार रुपयांच्या बॉण्डवर जामीन देण्यात आला होता.

बिग बॉसच्या 7 व्या सीझनमध्ये गेला होता. बिग बॉसमुळेच त्याला प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने कॉमेडी नाइट्स बचाओ, बॉक्स क्रिकेट लीग आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्येही काम केलं. तसेच त्याने रक्त चारुत्र, दोकुडू आणि टेंपर या सिनेमांमध्येही काम केलं आहे.

सुपरस्टारला किस करायला नकार देणं अभिनेत्रीला पडलं भारी, सिनेमातूनच काढलं बाहेर

लग्नाआधीच अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं ‘हे’ पाऊल

बिकीनी घातली नाही म्हणून अभिनेत्रीचं झालं कोट्यवधीचं नुकसान

'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी

First published: July 18, 2019, 6:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading