Home /News /entertainment /

'आपलं अफेअर आहे....' असं म्हणत जेव्हा पाकिस्तानी होस्टनं अजय देवगणला आणलं होतं अडचणीत

'आपलं अफेअर आहे....' असं म्हणत जेव्हा पाकिस्तानी होस्टनं अजय देवगणला आणलं होतं अडचणीत

अभिनेता अजय देवगणने ( Ajay Devgan ) 2007 मध्ये बेगम नवाझीश अली होस्ट करत असलेल्या पाकिस्तानी चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बेगम अलीने अजयला पत्नी काजोलसंदर्भात अनेक प्रश्न विचारून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 मे- अभिनेता अजय देवगणने (  Ajay Devgan  ) 2007 मध्ये बेगम नवाझीश अली होस्ट करत असलेल्या  पाकिस्तानी चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बेगम अलीने अजयला पत्नी काजोलसंदर्भात अनेक प्रश्न विचारून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. या चॅट शोचा हा एपिसोड खूप गाजला होता. अजयचा ‘ओंकारा’ (Omkara) हा चित्रपट पाकिस्तानमध्ये हिट झाल्यानंतर अजयसोबत एक एपिसोड शूट करण्यात आला होता. या वेळी बेगम नवाझीश अली (Begum Nawazish Ali) अजयसोबत फ्लर्ट करत म्हणाली होती की, आपलं अफेअर (Affair) आहे. काय झालं आणि कसं झालं हे कोणालाच माहीत नाही. काजोलला (Kajol) नक्कीच कळणार नाही, डार्लिंग, लोकांची प्रायव्हसी (Privacy) कशी जपावी, हे मला माहीत आहे. मला होमब्रेकर व्हायचं नाही. शिवाय, ती भारतात आहे, मी पाकिस्तानात आहे. तिला याविषयी काहीच प्रॉब्लेम नसेल, नाही का?"यावर अजय हसला आणि म्हणाला, "तू तिलाच विचारायला हवंस." त्यानंतर ही चर्चा भारतीय (India) आणि पाकिस्तानी (Pakistan) पुरुषांच्या असुरक्षिततेकडे गेली. भारत आणि पाकिस्तानमधील पुरुषांना वाटतं की ते आपल्या पत्नीचे मालक आहेत, यावर तुला काय वाटतं, असा सवाल बेगम अलीने अजयला विचारला. यावर अजय म्हणाला, “मला तर ते खरं वाटत नाही. आणि हे पुरुषांबद्दल नाही, तर तो मानवी स्वभाव आहे. तुम्हाला कुणीतरी व्यक्ती आवडते ती तुम्हाला मिळाली की ती व्यक्ती तुमचीच असावी असं तुम्हाला वाटतं.” वाचा-अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, क्यूट व्हिडिओत दिसला दोघींचा प्रेमळ अंदाज यानंतर होस्ट बेगम अलीने अजयला पत्नी काजोलसंदर्भात आणखी एक प्रश्न विचारला. “काजोलने तुझ्याशी लग्न केल्यानंतर आधीप्रमाणे चित्रपटांमध्ये दिसली नाही’, यावर अजय म्हणाला, “हा पूर्णपणे तिचा निर्णय आहे, ती खूप सिलेक्टिव्ह (Selective) आहे. तिने एखाद्या चित्रपटाबद्दल ऐकलं आणि ती जर तो चित्रपट करण्यास उत्साहित असेल तर ती तो चित्रपट करेल. तो पूर्णपणे तिचा निर्णय आहे.” तू तिच्यावर काही बंधनं लादली आहेस का, असं विचारले असता तो म्हणाला, “नाही, अजिबात नाही, जर तिच्यावर बंधनं असती, तर ती आता जे करतीये ते करताना दिसली नसती,” असं म्हणत अजयने बेगम अलीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. वाचा-Happy Birthday Mukta Barve: कोणत्या अभिनेता-दिग्दर्शकावर मुक्ता झाली होती फिदा? यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना विवाहित जोडप्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडींबद्दल (Adjustment) अजयने मत व्यक्त केलं होतं. “मला नाही वाटत की लग्न ही तडजोड आहे. तुम्ही लग्न करताय तर दोघांनीही स्वतःला आणि परस्परांना समजून घ्यावं लागेल आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीशी निष्पक्ष असलं पाहिजे. तुमच्यात गैरसमज निर्माण होईल, अशी गोष्ट असायला नको. तसंच तुम्ही गोष्टी आहेत तशा स्वीकारल्या तर तुम्हाला तडजोड करावी लागणार नाही,” असं अजय म्हणाला होता. दरम्यान, अजयचा हा एपिसोड तेव्हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. होस्ट बेगम अलीकडून अजयला अडचणीत आणणारे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, परंतु त्यांने सर्व प्रश्नाची हजरजबाबीपणे उत्तरं दिली होती. वाचा-'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस अजय देवगण अभिनित आणि दिग्दर्शित रनवे 34 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला पण त्याला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं नाही. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तो आगामी मैदान आणि थँक गॉड या चित्रपटांमध्ये दिसेल. अजय आणि काजोल यांनी 1999 मध्ये लग्न केलं आणि त्यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत.
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Pakistan

    पुढील बातम्या