दुसऱ्या बाईकडे पाहताना अजय देवगण जेव्हा बायकोकडूनच पकडला जातो...

'दे दे प्यार दे' या सिनेमात अजय स्वतःहून निम्म्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमांस करताना दिसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 07:10 PM IST

दुसऱ्या बाईकडे पाहताना अजय देवगण जेव्हा बायकोकडूनच पकडला जातो...

मुंबई, 16 मे : बॉलिवूडचे इव्हेंट आणि पार्ट्या यांपासून नेहमीच दूर राहणारा अजय देवगण आपला मोकळा वेळ नेहमीच आपल्या कुटुंबासोबत घालवताना दिसतो. अजय आणि काजोलच्या लग्नाला आता 20 वर्ष झाली असून काजोलकडे पाहून तिला काय वाटतंय याचा अजयाला अंदाज येऊ शकतो असं तो सांगतो. सध्या अजय 'दे दे प्यार दे' या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून एका इव्हेंटमध्ये अजयनं काजोल आणि त्याच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

'दे दे प्यार दे' या सिनेमात अजय स्वतःहून निम्म्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमांस करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये अजयला तु रिअल लाइफमध्येही असाच आहेस का जशी भूमिका तू या सिनेमात साकारत आहेस. असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजयनं मी खऱ्या आयुष्यात असा अजिबात नाही असं उत्तर दिलं.

Cannes 2019 लिपस्टिकच्या रंगावरून ट्रोल झालेल्या आपल्या सुनेची अमिताभ यांनी अशी घेतली होती बाजू

अजय पुढे म्हणाला, 'हो मी कधी कधी दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होतो. पण ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी असं कधीच असं केलं नाही तर असं नाही आहे.' यावेळी जेव्हा काजोल तुला कोणत्या दुसऱ्या महिलेकडे पाहताना पकडते तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असते. असा प्रश्न अजयला विचारण्या आला. यावर अजयनं, 'जेव्हा काजोल मला असं करताना पाहते, त्यावेळी ती लगेच कमेंट पास करते. जो एखादा विनोद असतो.' असं उत्तर दिलं.


Loading...अजय सांगतो, 'काजोलला त्याचा आगामी सिनेमा 'दे दे प्यार दे'च्या ट्रेलरबाबत काहीही समस्या नाही. तिला या इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं याची पूर्ण कल्पना आहे.' अजयचा हा सिनेमा 17 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये अजय सोबत अभिनेत्री तब्बू आणि राकुल प्रीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात तब्बू अजयाच्या एक्स वाइफच्या भूमिकेत आहे. तर अजय स्वतःहून निम्म्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. असं दाखवण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी अजयला त्याच्या कॅन्सर पिडित चाहत्यानं तंबाखूची जाहीरात न करण्याविषयी सुचवलं होतं. त्यावर जवळपास एका आठवड्यानंतर अजयनं यावर आपलं मतं माडलं. तो म्हणाला, मी समाजावर नकारात्मक परिणाम करतील अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही आणि ती जाहीरात तंबाखूची नाही तर वेलचीची आहे.

पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ

Cannes 2019 - टीव्ही अभिनेत्री हिना खान पहिल्यांदाच रेड कार्पेटवर, हे ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...