अजय देवगण करणार मराठी सिनेमाची निर्मिती, नाना पाटेकर असणार मुख्य भूमिकेत

अजय देवगण करणार मराठी सिनेमाची निर्मिती, नाना पाटेकर असणार मुख्य भूमिकेत

देसी गर्ल प्रियंका चोप्राने मराठीत निर्माती म्हणून पदार्पण केल्यानंतर आता अजय देवगणही त्याच मार्गावर आहे. अजय एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे.

  • Share this:

15 जुलै : देसी गर्ल प्रियंका चोप्राने मराठीत निर्माती म्हणून पदार्पण केल्यानंतर आता अजय देवगणही त्याच मार्गावर आहे. अजय एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे.

वॉटर गेट प्रॉडक्शन्स आणि अजय देवगण प्रॉडक्शन्स एकत्र येऊन अनेक सिनेमांची निर्मिती करणार आहे. या बॅनरने एक मराठी सिनेमा निश्चितही केलाय. या सिनेमाचं नाव अजून ठरलं नाही आहे. सतिश राजवाडे सिनेमाचं दिग्दर्शन करतील. या सिनेमात अजय पाहुणा कलाकार म्हणून झळकणार आहे. अजय देवगण निर्मित या सिनेमात अभिनेता नाना पाटेकर यांच्यासोबतच इरावती हर्षे आणि सुमित राघवन प्रमुख भूमिकेत दिसतील.

अजयने आतापर्यंत अनेक निरनिराळ्या भाषांतील सिनेमांची निर्मिती केली असून त्याचा हा मराठमोळा अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नाना पाटेकर ही या सिनेमाचा सहनिर्माता असणार आहे.

First published: July 15, 2017, 5:59 PM IST

ताज्या बातम्या