मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: अजय देवगनने उडविली कपिल शर्माच्या कपड्यांची खिल्ली, शोबद्दल सांगितली मोठी गोष्ट

VIDEO: अजय देवगनने उडविली कपिल शर्माच्या कपड्यांची खिल्ली, शोबद्दल सांगितली मोठी गोष्ट

अजय देवगन  (Ajay Devgn)  हा बॉलिवूडमधील   (Bollywood)  अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जो सतत कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टसमध्ये व्यग्र असतो. सध्या अजय देवगन त्याचा आगामी चित्रपट 'रनवे 34' च्या (Runway 34)  प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 21 एप्रिल- अजय देवगन  (Ajay Devgn)  हा बॉलिवूडमधील   (Bollywood)  अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जो सतत कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टसमध्ये व्यग्र असतो. सध्या अजय देवगन त्याचा आगामी चित्रपट 'रनवे 34' च्या (Runway 34)  प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकतंच 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. या वीकेंडला हा एपिसोड प्रसारित होणार आहे. दरम्यान सोशल मीडिया अकाउंटवर शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कपिल  (Kapil Sharma)  आणि अजय एकमेकांची चेष्टामस्करी करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या या प्रोमोमध्ये, सुरुवातीला कपिल शर्मा 'रनवे 34' मधील दमदार स्टार कास्ट अजय देवगन, रकुल प्रीत सिंह, अंगिरा धर आणि आकांक्षा सिंह या कलाकारांचे स्वागत करताना दिसत आहे. यानंतर कपिल शर्मा अजयकडे आपला मोर्चा वळवत म्हणतो, “मी यांना सूट-बूटमध्ये पाहिले, तेव्हा मला वाटले की अजय सर कुठेतरी बँकमध्ये जॉईन झाले कि काय…. आज तुम्ही खूप हँडसम दिसत आहात सर." असं म्हणत कपिल अजयशी थोडी मजामस्ती करतो. दरम्यान अजय देवगन शेरास सव्वा शेर ठरत कपिल शर्माच्या या विनोदाला उत्तर देत म्हणतो, “तू चांगले कपडे घालत नाहीस, मग काय करणार.. त्यामुळे मला वाटलं मीच थोडे चांगले कपडे घालून या शो ला अजून जास्त उंचावर पोहोचवावं. हा एक मजेशीर प्रसंग होता हे वेगळं सांगायला नको. अजयच्या या उत्तराने स्टेजवर उपस्थित सर्व लोक आणि प्रेक्षक जोरजोरात हसायला लागतात. यानंतर कपिल रकुलसाठी 'ऐसे ना मुझे तुम देखो' गाणे म्हणू लागतो. यादरम्यान रकुल हसत त्याला सहकार्य करताना दिसते.
गेल्या काही दिवसांपासून अजय देवगन आपल्या बिग सिनेमा RRR मुळे तुफान चर्चेत होता. या साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपटात अजयने छोटी परंतु अत्यंत महत्वाची भूमिका साकारली आहे. यामध्ये अजयने राम चरणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. यामध्ये अभिनेत्री श्रिया सरन त्याची को स्टार होती. या दोघांनी 'दृश्यम' मध्येसुद्धा एकत्र काम केलं आहे. सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अजय आणि रकुल प्रीत सिंहचा 'रनवे 34' 29 एप्रिलला रिलीज होणार आहे.
First published:

Tags: Ajay devgan, Bollywood News, Entertainment, Kapil sharma, The kapil sharma show

पुढील बातम्या