काजोल-अजय 12 वर्षींनी दिसणार एकत्र, ‘तानाजी’मधील तिचा First Look रिलीज

काजोल-अजय 12 वर्षींनी दिसणार एकत्र, ‘तानाजी’मधील तिचा First Look रिलीज

या सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : अजय देवगणचा आगामी सिनेमा 'तानाजी-द अनसंग वॉरियर' (Tanhaji : The Unsung Warrior) मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपासून या सिनेमाच्या नावाच्या स्पेलिंगमुळे वादाची चिन्ह होती. पण खुद्द तानाजी मालुसरे यांच्याच वंशजांनी याला पाठिंबा दिल्यानं या वादावर सुरू होण्याआधीच पडदा पडला. हा सिनेमा अजयसाठी खूप महत्त्वाचा तर आहेच पण काही कारणानं खूप खासही आहे. कारण हा सिनेमा त्याचा बॉलिवूडमधील 100 वा सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला.

अजय देवगणनं त्याच्या सोशल मीडियावर ‘तानाजी’मधील काजोलचा फर्स्ट लुक शेअर केला. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील पोस्टरमध्ये काजोलचा लुक खूपच दमदार दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अजयनं लिहिलं, ‘सावित्रीबाई मालुसरे- तानाजीच्या साहसाचा आधारस्तंभ आणि त्यांच्या बळाची शक्ती’ तर काजोलनं तिचा फर्स्ट लुक शेअर करताना लिहिलं, मी तुम्हाला हारू देणार नाही.

रानू मंडलचा मेकओव्हर PHOTO VIRAL, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

तानाजी सिनेमा हा अजय देवगणच्या 30 वर्षांच्या सिने करिअर मधील 100 वा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. काजोल आणि अजय देवगण ‘यू मी और हम’ या सिनेमात शेवटचे एकत्र दिसले होते. हा सिनेमा 2008 मध्ये रिलीज झाला होता.

अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या या अभिनेत्रींच्या नावावर हिट होतात सिनेमा!

...आणि हॉटेलच्या खिडकीतून उतरली विद्या बालन Video व्हायरल

====================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या