मुंबई, 30 जानेवारी : अभिनेता अजय देवगण मागच्या काही काळापासून तान्हाजी सिनेमामुळे चर्चेत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला रिलीज झालेला हा सिनेमा अद्याप बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत टिकून आहे. पण तानाजी मालुसरे यांच्या बायोपिकनंतर आता अजय देवगण ‘मैदान’ सिनेमातून नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.
‘मैदान’ या सिनेमातून अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून अजय देवगणनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर करत याची माहिती दिली. त्यानं लिहिलं, ‘ही कथा आहे इंडियन फुटबॉलच्या सुवर्णकाळाची आणि त्याच्या सर्वोक्तृष्ट आणि यशस्वी प्रशिक्षकाची.’
बॉलिवूडचा खिलाडी कुमार आता Man vs Wild मध्ये, बीयर ग्रील्ससोबत करणार जंगल सफर
Yeh kahaani hai Indian football ke Golden phase ki aur uske sabse badey aur successful coach ki.#Maidaan@Priyamani6 @raogajraj @BoneyKapoor @iAmitRSharma @freshlimefilms @SaiwynQ @ActorRudranil @writish @saregamaglobal @ZeeStudios_ @ZeeStudiosInt @BayViewProjOffl pic.twitter.com/djVktm8bft
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 30, 2020
अजय देवगणनं शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये एक टीम दिसत आहे. जी पावसात भिजत आहे आणि या सर्वांच्या समोर अजय देवगण उभा आहे. तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये अजय देवगण बॅग आणि छत्री हातात घेऊन पुटबॉल खेळताना दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अजयनं लिहिलं, ‘बदल घडवण्यासाठी एक व्यक्तीही पुरेशी असते.’
गुरुद्वाराबाहेर तरुणाने काढली तापसीची छेड, रागात अभिनेत्रीने बोट धरलं आणि...
“Badlav lane ke liye ek akela bhi kafi hota hai”#Maidaan@Priyamani6 @raogajraj @boneykapoor @iAmitRSharma @freshlimefilms @saiwynQ @actorrudranil @writish @saregamaglobal @zeestudios_ @zeestudiosint @BayViewProjOffl @MaidaanOfficial pic.twitter.com/YQTMPCaVXR
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 30, 2020
'मैदान' या सिनेमात 1956 ते 1962 या काळातील भारतीय फुटबॉल टीम आणि त्यांचे प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांचा काळ दाखवण्यात येणार आहे. हा काळ भारतीय फुटबॉल टीमचा सुवर्णकाळ होता. 1956 मध्ये भारतीय टीम मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये पोहोचली होती आणि यात भारतीय टीमनं सेमिफायनल पर्यंतचा पर्वास केला होता. यानंतर कोणतीही भारतीय फुटबॉल टीम अशी कामगिरी करु शकलेली नाही. त्यावेळी या टीमचे प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम होते. जे कॅन्सरग्रस्त असतानाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीमनं 1962ला एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. अजय या सिनेमात याच प्रशिक्षकांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
प्रियांका चोप्रा फिटनेससाठी रोज 'हा' पदार्थ खाते, वाचून व्हाल हैरण