2020मध्ये बॉक्सऑफिसवर होणार मोठी टक्कर, या कलाकारांमध्ये रंगणार तगडी स्पर्धा

सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण आदी स्टार कलाकारंच्या सिनेमांची रिलीज डेट सारखीच असल्यानं 'काँटे की टक्कर' होताना दिसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 04:50 PM IST

2020मध्ये बॉक्सऑफिसवर होणार मोठी टक्कर, या कलाकारांमध्ये रंगणार तगडी स्पर्धा

सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमांचा बोलबाला आहे. एकीकडे नवनव्या सिनेमांच्या घोषणा होत आहेत तर दुसरीकडे पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या समस्या वाढताना दिसत आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमांचा बोलबाला आहे. एकीकडे नवनव्या सिनेमांच्या घोषणा होत आहेत तर दुसरीकडे 2020मध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या समस्या वाढताना दिसत आहेत.


2020 मध्ये येणारे सर्वच बिग बजेट सिनेमांमध्ये 'काँटे की टक्कर' होताना दिसणार आहे. सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण आदी स्टार कलाकारंच्या सिनेमांची रिलीज डेट सारखीच असल्यानं त्याच्यासमोरील कलेक्शनच्या समस्या आणखी वाढणार आहे.

2020मध्ये येणाऱ्या सर्वच बिग बजेट सिनेमांमध्ये 'काँटे की टक्कर' होताना दिसणार आहे. सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण आदी स्टार कलाकारंच्या सिनेमांची रिलीज डेट सारखीच असल्यानं त्याच्यासमोर कमाईची समस्या आणखी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.


सर्वात मोठी स्पर्धा अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात असणार आहे. सलमानचा 'इन्शाअल्लाह' आणि अजय देवगणचा 'सूर्यवंशी' एकत्र प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा 'इन्शाअल्लाह' 2020 मध्ये ईदीच्या दिवशी प्रदर्शित होणार असून अजयचा 'सूर्यवंशी' सुद्धा त्याच दिवशी प्रदर्शित होईल अशी चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

सर्वात मोठी स्पर्धा अक्षय कुमार आणि सलमान खानमध्ये  असणार आहे. सलमानचा 'इन्शाअल्लाह' आणि अजय देवगणचा 'सूर्यवंशी' सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा 'इन्शाअल्लाह' 2020 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार असून अजयचा 'सूर्यवंशी' सुद्धा त्याच दिवशी प्रदर्शित होईल, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

Loading...


दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी' यांच्यातही बॉक्सऑफिसवर तगडी स्पर्धा होणार आहे. दोघांचेही सिनेमा एकाच दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतं हे पाहणं रजक ठरणार आहे.

दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी' यांच्यातही बॉक्सऑफिसवर तगडी स्पर्धा होणार आहे. दोघांचेही सिनेमा एकाच दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


सध्या बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. राजामैलींच्या 'RRR'आलिया आणि वरुण धवनला कास्ट करण्यात आलं आहे. हा सिनेमा 30 जुलै 2020ला प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे रणबीर कपूरचा 'शमशेरा' सुद्धा याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

सध्या बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. राजामौलींच्या 'RRR' सिनेमात आलिया आणि वरुण धवनला कास्ट करण्यात आलं आहे. हा सिनेमा 30 जुलै 2020ला प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे रणबीर कपूरचा 'शमशेरा' सुद्धा याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...