Home /News /entertainment /

‘हे तर पानमसाला बंधू’; गुटख्याच्या जाहिरातीमुळं अजयसोबत शाहरुखही होतोय ट्रोल

‘हे तर पानमसाला बंधू’; गुटख्याच्या जाहिरातीमुळं अजयसोबत शाहरुखही होतोय ट्रोल

गेली अनेक वर्ष दोघांनी चित्रपटात एकत्र काम करावं, याची वाट पाहात आहेत. मात्र चाहत्यांची ही इच्छा एका पान मसाला कंपनीनं पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या जाहिरातीत अजयसोबत शाहरुखला देखील कास्ट केलं आहे.

    मुंबई 21 मार्च: अजय देवगण (Ajay Devgn) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखले जातात. अजयला अॅक्शनचा सरताज असं म्हटलं जातं तर शाहरुखची रोमान्स किंग म्हणून स्तुती केली जाते. परंतु हे दोन्ही कलाकार अद्याप कुठल्याही चित्रपटात एकत्र झळकलेले नाहीत. चाहते गेली अनेक वर्ष दोघांनी चित्रपटात एकत्र काम करावं, याची वाट पाहात आहेत. मात्र चाहत्यांची ही इच्छा एका पान मसाला कंपनीनं पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या जाहिरातीत अजयसोबत शाहरुखला देखील कास्ट केलं आहे. (pan masala ad) अजय देवगण गेली अनेक वर्ष या पानमसालाची जाहिरात करत होता पण आता त्याच्यासोबत शाहरुख खानदेखील झळकणार आहे. या पानमसालाची जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली. मात्र ही जाहिरात पाहून काही नेटकरी संतापले आहेत. त्यांनी या जाहिरातीवरुन कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या कलाकारांवर तयार केलेले काही मीम्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. “आम्ही गेली अनेक वर्ष तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर एकत्र पाहता येईल याची वाट पाहात होतो. अखेर 2021 मध्ये तुम्ही एकत्र आलात पण एका पानमसालाच्या जाहिरातीत. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.” अशा आशयाचे ट्विट केले जात आहेत. दुसऱ्या एका युझरनं तर या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे. “गुप्तहेरांचं युनिव्हर्स पाहिलं, सुपरहिरोंचं युनिव्हर्स पाहिलं, विनोदी कलाकारांचं युनिव्हर्स पाहिलं आता पानमसालाचं युनिव्हर्स पाहतोय.” असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. अवश्य पाहा - “मी हरामखोर नाही देशभक्त आहे”; कंगनानं केला सरकारला एक्सपोज करण्याचा दावा अवश्य पाहा - ‘लहान कपड्यांमुळं स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवलं’; गायिकेनं सांगितला काय आहे जाहिरातीत? अजय देवगण पान मसाला खात असतो तेवढ्यात त्याला त्याच कंपनीच्या पानमसाल्याचा वास येतो. हा वास कुठून येतोय याचा शोध अजय घेऊ लागतो. शोध घेत असतानाच त्याला शाहरुख खान पानमसाला खाताना दिसतो. दोघं एकमेकांना ओळखतात. कारण ते पूर्वीपासूनचे मित्र असतात. या पानमसालामुळं दोन जुन्या मित्रांची पुन्हा एकदा भेट होते. असं या जाहिरातीत दाखवलं गेलं आहे. अर्थात या जाहिरातीमुळं काही चाहते सध्या संतापले आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या