Tanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारे ‘तानाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 06:10 PM IST

Tanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज

मुंबई, 21 ऑक्टोबर : कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये चांगल यश मिळवणाऱ्या अजय देवगणनं आता ऐतिहासिक सिनेमांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. लवकरच त्याचा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारे ‘तानाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा फर्स्ट लुक समोर आला आहे. 'तानाजी'चं फर्स्ट पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून याचा युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

MIND that was as sharp as a sword... #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020. @kajol #SaifAliKhan @omraut @bhushankumar #AjayDevgnFFilms @tseries.official @tseriesfilms @tanhajifilm

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

'तानाजी' सिनेमाच्या पोस्टरवरील अजय आणि सैफ यांचा लुक खूपच इम्प्रेसिव्ह दिसत आहे. या सिनेमात अजय देवगण अजय योद्ध्याची भूमिका साकारत आहे. अजय देवगणनं या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. यासोबतच या सिनेमाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 10 जानेवारीला रिलीज होणार आहे.

'या' सेलिब्रेटींनी शेअर केले HOT PHOTO, एक तर आहे युवराज सिंहची एक्स गर्लफ्रेंड

तानाजी सिनेमात अजय देवगण 17 व्या शतकातील मराठा सैन्यानतील सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढता लढता धारातीर्थी पडले होते. या सिनेमात अजय देवगणसोबत काजोल सुद्धा स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं असून सैफ अली खान या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता नील नितिन मुकेशचा मुलीसोबत क्यूट डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का?

==========================================================

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 06:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...