आजोबा जाऊन 24 तासही उलटले नाहीत आणि अजय-काजोलच्या लेकीने केली सलॉन वारी, VIDEO व्हायरल

अजय यांचे वडिल वीरु देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 08:50 PM IST

आजोबा जाऊन 24 तासही उलटले नाहीत आणि अजय-काजोलच्या लेकीने केली सलॉन वारी, VIDEO व्हायरल

मुंबई, 28 मे : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं सोमवारी निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. वीरू प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक होते. त्यांच्यावर विलेपार्लेच्या पवनहंस स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र इन डॉट कॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरु यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 24 तास उलटून गेल्यानंतर अजय आणि काजोल यांची लेक निसा बांद्रामधील एका सलूनमध्ये आपल्या मैत्रींसोबत मजा-मस्ती करताना दिसली. त्यामुळे नेटेकरांनी तिची चांगलीच शाळा घेतली.

मंगळवारी, अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा आपल्या मित्र मैत्रींसोबत बांद्रामध्ये फिरताना कॅमेरात कैद झाली. निसा ही अजय आणि काजोल यांची मोठी मुलगी आहे. एकीकीडे बॉलिवूडचे स्टार अजय आणि काजोल यांचे सांतवन करत असताना, त्यांची लेक हसताना आणि खिदळताना दिसली. अजय आणि काजोल आपल्या मुलांसोबत कॅमेरासमोर जास्त दिसत नाहीत. मात्र निसाचा हा अवतार पाहून अजय आणि काजोलाही तिचा राग आल्याशिवाय राहणार नाही. निसाचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Loading...

 

View this post on Instagram
 

#AjayDevgn's daughter #NysaDevgn spotted at a salon by the shutter bugs. . . . . . #bollywood #entertainment #indotcom #paprazzi #trending #veerudevgan


A post shared by IN.com (@indotcom) on

दरम्यान, अजय यांचे वडिल वीरु देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे. याशिवाय ‘हिंदुस्तान की कसम’ नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. फक्त अ‍ॅक्शन आणि दिग्दर्शनच नाही तर वीरू यांनी अभिनेता म्हणूनही अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘क्रांती’ (१९८१), ‘सौरभ’ (१९७९) आणि ‘सिंहासन’ (१९८६) या सिनेमांत त्यांनी अभिनयही केला होता. अ‍ॅक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचे ‘फूल और कांटे’, ‘हिम्मतवाला’, ‘प्रेम रोग’, ‘क्रांती’, ‘दो और दो पांच’ हे सिनेमे तुफान गाजले होते.

वीरू यांना पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जाणं फारसं पसंत नव्हतं. कामाव्यतिरिक्त ते घरत राहणं जास्त पसंत करायचे. त्यांना अजयच्या ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या स्क्रीनिंगला शेवटचं पाहण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत सातत्याने खालवत होती. यामुळे अजय देवगणने ‘दे दे प्यार दे’ सिनेमाचं प्रमोशन अर्ध्यावर सोडलं होतं. यानंतर त्याने संपूर्ण वेळ वडिलांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं अजय जास्त भावूक झालेला पाहायला मिळाला.
एवढेच नाही तर, त्यांची सुन आणि प्रसिध्द अभिनेत्री काजोलही ढसाढसा रडताना पाहायला मिळाली. तर, अजय आणि काजोल यांचे सांतवन करण्यासाठी सनी देओल, बॉबी देओल, संजय दत्त, शाहरुख खान यांच्यासह ऐश्वर्या राय हजर होते.


SPECIAL REPORT : विधानसभेतही पश्चिम महाराष्ट्राचा बालेकिल्ला शरद पवारांच्या हातून निसटणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...