मुंबई, 12 ऑक्टोबर: अजय देवगणच्या (Ajay Devgn New Project) चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार नंतर, अजय देवगण आता त्याच्या चाहत्यांना 'इनटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' या शोमध्ये दिसणार आहे. आज या शोचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यात चाहत्यांना अजय देवगणचे 'Into the wild' रूप पाहायला मिळते आहे. अजय देवगण आणि बेअर ग्रिल्सने प्रोमोच्या अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकांना इशारा दिला की हा अनुभव लहान मुलांचा खेळ नाही.
डिस्कव्हरी या रिअल लाईफ मनोरंजन नेटवर्कने गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मॅन वर्सेस वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स ह्या कार्यक्रमाचा एपिसोड सादर केला होता. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार अशा दिग्गजांचा समावेश त्या नेटवर्कवर झाला होता. हे नेटवर्क आता बॉलिवूडमधील सुपर कॉप अजय देवगणचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाचा नवीन थरारक सीजन आणत आहे. हिंदी महासागरामध्ये शूट झालेल्या ह्या आपल्या अतिशय बहुप्रतीक्षित कार्यक्रमाची पहिली झलक आज डिस्कव्हरीने सादर केली. अभिनेता अजय देवगण आणि वाईल्ड आयकॉन बेअर ग्रिल्स एका अतिशय साहसी व थरारक अन्य प्रदेशामधील ठिकाणी कसे जातात, हे बघता येईल.
Bigg Boss च्या घरात राडा घालणारा आदिश वैद्य या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट
दरम्यान आज या प्रोमोच्या रीलिजदरम्यान अजय देवगण आणि बेअर ग्रिल्स यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. Ajay Devgn and Bear Grylls for Into The Wild Trailer Launch दरम्यान एशिया डिस्कव्हरी इन्कच्या मॅनेजिंग डिरेक्टर मेघना टाटा देखील उपस्थित होत्या. यामध्ये अजय देवगणने त्याच्या जीवनातील हा अनुभव कसा होता याबाबत भाष्य केले, तर बेअर ग्रिल्सने भारतातील अनुभव कसा होता हे शेअर केलं.
यावेळी अजय म्हणाला की, मला बऱ्याचदा काही कळत नव्हतं बेअर काय करत होता, मी जस्ट त्याला फॉलो करत होतो. शूटिंगमध्ये प्लॅन आणि रिटेक असतात. याठिकाणी रिटेक नव्हता. काहीही घडू शकलं असतं, कारण अनोळखी ठिकाणी होतो. अजयच्या मते हा अनुभव भीतीदायक आणि गमतीदार होता.
एकवीरा देवीच्या रुपातून या मराठमोळ्या अभिनेत्रीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
दरम्यान या ट्रेलरमध्ये पाहता येईल बराचसे दृश्य पाण्यातील आहे. हा काही खेळ नाही असं म्हणताना अजय दिसत आहे. शिवाय शार्क दिसल्यावर बेअर ग्रिल्सने अजयला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रोमो पाहून असे वाटते की, बेअर ग्रिल्स आणि अजय देवगण पाण्यात अशा ठिकाणी आहेत जेथे शार्क आहेत.
View this post on Instagram
हा भाग सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये शूट करण्यात आला होता. डिस्कव्हरी प्लस एक्सक्लुझिव्हमध्ये, बेअर ग्रिल्स अजय देवगणसोबत त्याचे कुटुंब, करिअर, आयुष्य आणि शोमधून शिकलेल्या धड्यांवर बोलताना दिसेल.
यापूर्वी अक्षय कुमारने बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये आणि रजनीकांत यांनी टायगर रिझर्व्हमध्ये 'इनटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' साठी शूट केले होते. अजय देवगणचे चाहते या शोसाठी विशेषतः उत्सुक आहेत. यामध्ये अजय देवगण प्रेक्षकांना एका नव्या अवतारात दिसणार आहे जो कदाचित यापूर्वी कधीच पाहिला नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan