अजय देवगणच्या 'आपला मानूस'मध्ये नाना पाटेकर

अजय देवगणच्या 'आपला मानूस'मध्ये नाना पाटेकर

अभिनेता अजय देवगणचा दुसरा मराठी सिनेमा 'आपला मानूस'चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आलाय. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणारेत.

  • Share this:

29डिसेंबर : अभिनेता अजय देवगणचा दुसरा मराठी सिनेमा 'आपला मानूस'चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आलाय. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात  अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणारेत.

सिनेमाच्या या पोस्टरमध्ये नाना बाईक चालवताना दिसतायत, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्ष वेधून घेणारे आहेत. तसंच 'हा सैतान बाटलीत मावणार नाय' अशी टॅगलाईनही देण्यात आलीये.

अजय देवगणची निर्मिती असणारा हा आगळावेगळा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला रिलीज होणारे. याआधी अजयनं विटीदांडू  या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. काजोलमुळे अजय देवगणचा मराठीकडे ओढा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 05:43 PM IST

ताज्या बातम्या