करण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने

करण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने

करण जोहर आणि अजय देवगण यांचं भांडण जवळजवळ 2 वर्ष चाललं होतं.

  • Share this:

मुंबई, 5 नोव्हेंबर : करण जोहर आणि अजय देवगण यांचं भांडण जवळजवळ 2 वर्ष चाललं होतं.अजय देवगणचा 'शिवाय' आणि करणचा 'ऐ दिल है मुश्किल' एकाच दिवशी रिलीज झाला होता. त्यावेळी अजयनं करणवर पैसे देऊन तो अजयची इमेज खराब करतोय, हा आरोप केला होता.


अगदी करणची मैत्रीण काजेलनंही करणजवळ अबोला धरला होता. पण आता चित्र बदललंय. काही दिवसांपूर्वी करण आणि अजयला यशराज स्टुडिओत एकत्र पाहिलं होतं.


मिररच्या बातमीनुसार अजय देवगण काॅफी विथ करण शोमध्ये येणारेय. दिवाळीनंतर या शोचं शूटिंग होईल. महत्त्वाचं म्हणजे या शोमध्ये एकटा अजय येणार नाही. तर त्याच्या बरोबर काजोलही येणार आहे.


करण जोहर बाॅलिवूडमध्ये सगळ्यांचाच मित्र आहे. त्याची मैत्री सगळ्यांशीच चांगली असते. त्याचं शत्रुत्वही फार टिकत नाही. अजय देवगणच्या बहुचर्चित तानाजी सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.


अजय देवगणच्या बहुचर्चित 'तानाजी'मध्ये काजोलची भूमिका आहे. सिनेमाचं शूटिंगही सुरू झालंय. काजोल या सिनेमात अजय देवगणच्या बायकोची भूमिका करतेय. डीएनएच्या बातमीनुसार काजोलला सिनेमाची पटकथा आवडलीय. ती मराठी असल्यानं तानाजीच्या बायकोच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं काजोल म्हणाली.


सिनेमात अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्या भूमिका आमने सामने आहेत. या ऐतिहासिक सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा आजही सगळे आवडीने ऐकतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. मराठीमध्ये आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणनेत्याच्या ट्विटर अकाऊंटवरून आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत  झळकणार आहे.रणवीरच्या घरी सुरू झाला हळदीचा कार्यक्रम, Photos व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 10:39 AM IST

ताज्या बातम्या