Home /News /entertainment /

'तानाजी' सुसाट, रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आतापर्यंत कमावले इतके कोटी

'तानाजी' सुसाट, रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आतापर्यंत कमावले इतके कोटी

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत.

    मुंबई, 20 जानेवारी : शिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारा तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तान्हाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र तरीही चित्रपटाची क्रेज कमी झाली नसल्याचं दिसत आहे. तानाजी चित्रपट बाॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 100 कोटीचा आकडा पार केला. तानाजी चित्रपटाने चित्रपटाने 9 दिवसामध्ये 143 कोटीची कमाई केली आहे. आतापर्यत 'तानाजी' चित्रपटाची कमाई पाहता अंदाज लावण्यात येत आहे की, या आठवड्यामध्ये चित्रपट 200 कोटींचा टप्पाही पार करू शकतो. '...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा रिलीज झाल्यानंतर 'तानाजी'ने शुक्रवारी 15.10 कोटी, शनिवारी 20.57 कोटी, रविवारी 26.26 कोटी, त्यानंतर सोमवारी 13.75 कोटी, मंगळवारी 15.28 कोटी, बुधवारी 16.72 कोटी, गुरुवारी 11.23 कोटी कामाई केली होती. तसंच शुक्रवारी 12 कोटी तर शनिवारी 13 कोटीची कमाई केली आहे. याप्रकारे तानाजी चित्रपटाने आतापर्यंत 143 कोटीची कामाई केली आहे. तान्हाजी चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत काजोल देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत असल्याचं बॉक्स ऑफिसच्या आकड्यांतून दिसत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Ajay devagan, Bollywood

    पुढील बातम्या