मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मोदी की इंदिरा गांधी, सर्वात शक्तिशाली पंतप्रधान कोण? अजय देवगणनं दिलं हे उत्तर

मोदी की इंदिरा गांधी, सर्वात शक्तिशाली पंतप्रधान कोण? अजय देवगणनं दिलं हे उत्तर

अभिनेता अजय देवगण हा नेहमीच देशाविषयी असलेल्या कोणत्याही प्रश्नावर परखड मत मांडताना आपण पाहतो.

अभिनेता अजय देवगण हा नेहमीच देशाविषयी असलेल्या कोणत्याही प्रश्नावर परखड मत मांडताना आपण पाहतो.

अभिनेता अजय देवगण हा नेहमीच देशाविषयी असलेल्या कोणत्याही प्रश्नावर परखड मत मांडताना आपण पाहतो.

    मुंबई 16 ऑगस्ट: परखड विचारांची मांडणी करणारे व्यक्तिमत्व म्हणून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची (Bollywood Actor Ajay Devgan) ओळख आहे. प्रश्न कोणताही असला तरी त्याची त्यावरील भूमिका ही ठाम असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अजय देवगणचा भूज – द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj - The Pride Of India) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, सध्या सोशल मीडियासह सर्व स्तरावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एका मीडिया चॅनेलवर अजयची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखती दरम्यान अॅंकरने अजयला देशाच्या अनुषंगाने एक कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला. परंतु, ठाम भूमिका आणि परखड विचार मांडणाऱ्या अजयने या प्रश्नावर असे उत्तर दिले की या उत्तरामुळे अजयचे सर्वत्र कौतुक होत आहे. असा कोणता प्रश्न अजयला विचारला गेला आणि त्यावर त्याने काय उत्तर दिले जाणून घेऊया सविस्तर...

    अजयच्या या मुलाखतीबाबतचे वृत्त वन इंडिया या वेबपोर्टलने दिले आहे. अभिनेता अजय देवगण हा नेहमीच देशाविषयी असलेल्या कोणत्याही प्रश्नावर परखड मत मांडताना आपण पाहतो. स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर अजयचा भूज- द प्राईड ऑफ इंडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे सध्या अजय चर्चेत आहे. याच अनुषंगाने आज तक या न्यूज चॅनेलने त्याची नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीत देशाविषयीच्या प्रत्येक प्रश्नावर अजयने सडेतोड उत्तरे दिली. अजयची या उत्तरांना नेटिझन्स आणि प्रेक्षकांकडून कमालीची पसंती मिळाली आहे.

    खणाच्या साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य; सोनालीच्या नव्या फोटोंवर चाहते फिदा

    देशभक्तीपर चित्रपटांची गरज का आहे, असा प्रश्न या मुलाखतीत अजयला विचारण्यात आला, त्यावर बोलताना अजय म्हणाला की आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या महान शहिदांचा इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये नाही. जर आपण देशासाठी त्याग करणाऱ्या, बलिदान देणाऱ्या नायकांविषयी बोललो नाहीत तर आपण आपल्या देशावर प्रेम कसे करु शकू. जर लोकांना आपल्या या नायकांच्या बलिदानाविषयी माहिती झाली तरच आपण इतिहास खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असे म्हणता येईल.

    लवकरच अजय देवगण रुद्र या वेबसीरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ओटीटीचे योग्य दिशेने नियमन करणे आवश्यक आहे. परंतु, ओटीटीचे नवे नियम काय असतील याविषयी माझ्या मनात काहीशी भिती असल्याचे यावेळी अजय देवगणने सांगितले.

    ‘कृपया तो MMS डिलिट करा’; Private video व्हायरल झाल्यामुळे त्रिशाकर मधु त्रस्त

    या चर्चेनंतर अँकरने (Anchor) एक जरा कोड्यात टाकणारा प्रश्न अजयला विचारला. 1971 मध्ये इंदिरा गांधी (Indira Gandhi) या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या नेतृत्वात देशाने जे यश मिळवले, ते आजही देशभरात साजरे केले जाते. त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी उरीत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नेतृत्व होते. तुझ्या दृष्टिकोनातून या दोघांमध्ये सर्वात शक्तिशाली पंतप्रधान (Strongest Prime minister) कोण आहेत, असा प्रश्न अजयला अँकरने विचारला.

    या दोघांची तुलना होऊ शकत नाही. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी जे केले ते योग्य होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत ते देखील योग्यच आहे. दोन व्यक्ती आणि या दोन परिस्थितींची तुलना होऊ शकत नाही. जर एकच परिस्थिती असेल आणि त्यात दोन लोक असतील तर कोणी चांगले काम केले असा प्रश्न तुम्ही विचारु शकता. मात्र येथे दोन वेगवेगळ्या परिस्थिती आणि काळही भिन्न आहे, असे उत्तर अजयने दिले. त्यावर तू सुवर्णमध्य साधणारे उत्तर देणार, हे अपेक्षित होतं, अशी टिप्पणी अँकरने केली. यावर मजेशीर प्रतिक्रिया देत अजय म्हणाला, की तुम्ही असा प्रश्न विचारायला नको होता. पण मी काही चुकीचे उत्तर दिलं नाही ना?

    अजयच्या या उत्तराने प्रेक्षक आणि नेटिझन्सचे मन जिंकले. सध्या अजयची ही मुलाखत जोरदार चर्चेत आहे. अजय देवगण येत्या काळात बहुप्रतिक्षित मैदान, आरआरआर, सुर्यवंशी तसेच गोलमालच्या नव्या चित्रपट सिरीजमध्ये दिसणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Ajay devgan, Bollywood, Bollywood actor