'या' ऐतिहासिक सिनेमात बाॅलिवूडचे पती-पत्नी एकत्र

'या' ऐतिहासिक सिनेमात बाॅलिवूडचे पती-पत्नी एकत्र

त्यांनी मोजकेच सिनेमे एकत्र केले. त्यातला इश्क आणि प्यार तो होनाही था हिट झाले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकायला सज्ज झालीय.

  • Share this:

मुंबई, 24 आॅक्टोबर : काजोल आणि अजय देवगण यांनी मोजकेच सिनेमे एकत्र केले. त्यातला इश्क आणि प्यार तो होनाही था हिट झाले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकायला सज्ज झालीय.

अजय देवगणच्या बहुचर्चित 'तानाजी'मध्ये काजोलची भूमिका आहे. सिनेमाचं शूटिंगही सुरू झालंय. काजोल या सिनेमात अजय देवगणच्या बायकोची भूमिका करतेय. डीएनएच्या बातमीनुसार काजोलला सिनेमाची पटकथा आवडलीय. ती मराठी असल्यानं तानाजीच्या बायकोच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं काजोल म्हणाली.

सिनेमात अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्या भूमिका आमने सामने आहेत. या ऐतिहासिक सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा आजही सगळे आवडीने ऐकतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. मराठीमध्ये आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणनेत्याच्या ट्विटर अकाऊंटवरून आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत  झळकणार आहे.

‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, अशी कॅप्शन देत अजयने सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला होता.

ओम राऊत सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. अजय देवगणसोबत नितीन वैद्य या सिनेमाची निर्मिती करतायत. सिनेमा 2019मध्ये रिलीज होईल.

सुष्मिता सेनच्या लव्ह लाइफमध्ये आलं नवं वळणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 03:57 PM IST

ताज्या बातम्या