Home /News /entertainment /

सिंघमच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'सिंघम 3'मध्ये अजय देवगण करणार थेट पाकिस्तानी दहशतवाद्यांशीच दोन हात

सिंघमच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'सिंघम 3'मध्ये अजय देवगण करणार थेट पाकिस्तानी दहशतवाद्यांशीच दोन हात

सिंघम सिनेमातल्या बाजीराव सिंघमच्या पहिल्या चित्रपटात बाजीराव गोव्यातल्या कुख्यात गुंडाशी सामना करताना दाखवला होता तर दुसऱ्या भागात त्याचा सामना भ्रष्टाचारी नेत्याशी झाला होता. आता तिसऱ्या भागात सिंघम थेट दहशतवाद्यांशीच दोन हात करणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 नोव्हेंबर:  रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दोनच दिवसांत या सिनेमानं 50 कोटींपेक्षाही जास्त गल्ला जमवला आहे. ‘सिंबा’मध्ये रोहित शेट्टीनं ‘सूर्यवंशी’ची झलक दाखवली होती. तसंच ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या क्लायमॅक्सला ‘सिंघम 3’ (Singham 3) सिनेमाबद्दलची झलक दाखवली आहे. तुम्ही खरेखुरे सिंघम फॅन्स असाल, तर तुमच्यासाठी ही नक्कीच ‘गुड न्यूज’ आहे. कारण रोहित शेट्टी आता अजय देवगणबरोबर (Ajay Dewgan) लवकरच सिंघम 3 चं शूटिंग सुरू करणार आहे. विशेष म्हणजे सिंघम 3 (Singham 3) सिनेमाची रिलीज डेटही ठरवण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) प्लॅननुसार सगळं व्यवस्थित आणि वेळेवर झालं तर 2023च्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 रोजी सिंघम 3 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. सूर्यवंशी सिनेमामध्ये अजय देवगण (Ajay Dewgan) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) पाहुणे कलाकार होते. तसंच आता सिंघम 3 मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणवीर सिंह विशेष पाहुणे कलाकार असतील हे विशेष. अर्थात या सिनेमाबद्दल अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच रोहित शेट्टी या सिनेमाची औपचारिक घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. 'बॉलीवूड हंगामा'च्या वृत्तानुसार या चित्रपटात अजय देवगण पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सामना करताना दिसेल. अर्थात चित्रपटातल्या पाकिस्तानमधल्या दृश्यांचं चित्रीकरण भारतात होणार आहे. वाचा :राजकुमार राव-पत्रलेखाचं ठरलं ! पारंपारिक पद्धतीने करणार लग्न, तयारी सुरू सिंघम सिनेमातल्या बाजीराव सिंघमच्या भूमिकेतला अजय देवगण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. त्याची ही भूमिका आणि त्यातले अनेक संवाद अत्यंत लोकप्रिय आहेत. या मालिकेतल्या पहिल्या चित्रपटात बाजीराव गोव्यातल्या कुख्यात गुंडाशी सामना करताना दाखवला होता तर दुसऱ्या भागात त्याचा सामना भ्रष्टाचारी नेत्याशी झाला होता. आता तिसऱ्या भागात सिंघम थेट दहशतवाद्यांशीच दोन हात करणार आहे. वाचा :‘बबड्या’ दिसणार आता नव्या भूमिकेत; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती सिंघम 3 चं शूटिंग सुरू करण्यापूर्वी रोहित शेट्टी आधी रणवीर सिंहसोबतच्या ‘सर्कस’ या विनोदी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे. या सिनेमात रणवीर सिंहचा डबल रोल आहे. रोहितनं त्याच्या ओटीटी वेब सीरिजसाठी सिद्धार्थ मल्होत्राला (Siddharth MAlhotra) साइन केलं आहे. ही सीरिजही पोलीस ड्रामावर आधारित असल्याची माहिती आहे. रोहित शेट्टीनं कतरिना  कैफबरोबर बिग बॉस 15 (Big Boss 15) शोमध्ये जाऊन सूर्यवंशी सिनेमाचं प्रमोशन केलं. त्यावेळेस तिथं सलमान खान उपस्थित होता. अजय देवगणच्या सिंघम प्रमाणेच सलमानचा (Salman Khan)दबंग (Dabang) आणि त्यातली चुलबुल पांडेची (Chulbul Pandey) भूमिका अत्यंत लोकप्रिय आहे. ‘सिंघम’चा बाजीराव आणि ‘दबंग’चा चुलबुल यांना एका पडद्यावर एकत्र आणण्याची आपली इच्छा असल्याचं या वेळेस रोहितनं सलमानसमोरच सांगितलं. सलमानही त्यावेळेस त्याला होकार दिल्याचं दिसत होतं. आता बाजीराव आणि चुलबुल खरंच एकत्र आले तर दोघांच्याही फॅन्सना ती मोठी पर्वणी ठरेल. यामुळे ॲक्शनचाही डबल धमाका पाहायला मिळेल यात शंका नाही.
    First published:

    Tags: Ajay devgan, Akshay Kumar, Bollywood, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या