20 जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा आजही सगळे आवडीने ऐकतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. मराठीमध्ये आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, अशी कॅप्शन देत अजयने सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे.
He fought for his People, his Soil & his King Chhatrapati Shivaji. The unsung warrior of glorious Indian history, Subedar Taanaji Malusare. pic.twitter.com/3qTWvKdbol
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 19, 2017
‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आणि आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण पाहायला मिळत आहे.
ओम राऊत सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. अजय देवगणसोबत नितीन वैद्य या सिनेमाची निर्मिती करतायत. सिनेमा 2019मध्ये रिलीज होईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा