अजय देवगणनं खरेदी केली नवी लक्झरी कार, देशात फक्त 2 व्यक्तींकडे आहे ही गाडी!

अजय देवगणनं खरेदी केली नवी लक्झरी कार, देशात फक्त 2 व्यक्तींकडे आहे ही गाडी!

सिनेमांमध्ये गाड्यांसोबत स्टंट करणारा अजय देवगण रिअल लाइफमध्येही महागड्या गाड्यांचा तेवढाच चाहता आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : अभिनेता अजय देवगण अनेकदा त्याच्या अनेक सिनेमांमध्ये गाड्यांसोबत अनेक स्टंट करताना दिसतो. रिअल लाइफमध्येही अजय देवगण महागड्या गाड्यांचा तेवढाच चाहता आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अशा गाड्यांचा समावेश आहे ज्या फक्त लक्झरीच नाही तर खूप खासही आहेत. पण नुकतीच अजयच्या या लक्झरी कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे. अजय देवगणनं नुकतीच एसयूव्ही कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत लाखात नाही तर कोटींच्या घरात आहे. जाणून घेऊयात अजय देवगणच्या नव्या कार विषयी...

एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार अजय देवगणनं भारतातली सर्वात महागड्या Suv मधील एक कार खरेदी केली आहे. Rolls Royce Cullinan ही एक अशी एसयूव्ही कार आहे ज्याचं डिझीइन त्याच्या खरेदीदाराच्या मागणी नुसार केलं जातं. काही महिन्यांपूर्वी अजय देवगणनं ही Cullinan कार खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. ही कार लवकरच अजय देवगणच्या ताफ्यात सामील होणार आहे.

रानू मंडल यांचा पहिला-वहिला स्टेज शो गाजला, पाहा VIDEO

Loading...

 

View this post on Instagram

 

Biker boys!

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

या कारच्या किंमती बद्दल बोलायचं तर ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6.95 कोटी रुपये (एक्स शोरुम) खर्च करावे लागतील. ही कार भारतात दोनच व्यक्तींकडे आहे. या दोन व्यक्तींमध्ये मुकश अंबानी आणि भूषण कुमार यांचा समावेश होतो. या कारची एक्स शोरुम किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे. मात्र तिची ऑन रोड किंमत पाहिल्यास ती 10-15 टक्क्यांनी वाढू शकते. ही या कारची बेसिक किंमत आहे. मात्र या कारच्या व्हेरियंटनुसार बदलते. Rolls Royce ही कंपनी नेहमीच त्यांच्या कस्टमरच्या मागणीनुसार कारचं डिझाइन बनवते आणि त्यानुसारच कार तयार केली जाते.

गावस्करांचा चाहता पण चर्चा मात्र खिलाडी कुमारची, भेटा अक्षयच्या 'जुळ्या' भावाला!

 

View this post on Instagram

 

Playing to my strengths this Diwali ;)

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

अशाप्रकारे महागडी कार खरेदी करण्याची अजय देवगणची ही पहिलीच वेळ नाही. याधीही त्यानं अनेक महागड्या आणि लक्झरी गाड्या खरेदी केल्या आहेत. अजयाच्या कार कलेक्शनमध्ये Land Rover Range Rover, MINI Cooper, BMW Z4 यासोबतच अतर अनेक गाड्यांचा समावेश आहे. अजय लवकरच ‘मैदान’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो भारतीय फुटबॉल टीमचे कोच सैय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीला रुममेटनं केली बेदम मारहाण, काचेच्या ग्लासनं चेहरा केला खराब

=========================================================

SPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...