मुंबई, 02 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडण्याची घोषणा जेव्हापासून राज्य सरकारने केली आहे, तेव्हापासून एकामागून एक चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्यास चित्रपट निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. आता जूनियर एनटीआर (Jr NTR), राम चरण (Ram Charan), आलिया भट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgan) तसंच एस.एस.राजामौली (SS Rajamouli) यांचा 'आरआरआर' (RRR Release Date) या बिग स्टार चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखदेखील समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही फिल्म आलिया आणि अजयच्या गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi) या फिल्मसोबत क्लॅश होणार आहे.
'आरआरआर' चित्रपटाशी संबंधित स्टार कास्टने आज चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट आता 2022 मध्ये 7 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. तर गंगुबाई काठीयावाडीची रिलीज डेट याआधी जारी करण्यात आली आहे. ही फिल्म 6 जानेवारीला 2022 ला प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही फिल्ममध्ये अजय आणि आलिया आहेत. त्यामुळे या दोघांच्या या दोन्ही फिल्म आपसात भिडणार आहेत.
View this post on Instagram
'आरआरआर' हा असा चित्रपट आहे, ज्याची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट खास आहे कारण तेलुगु चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज आणि बॉलिवूडचे दोन मोठे कलाकार या एकाच चित्रपटात एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सगळ्यांना या सर्वांना एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
हे वाचा - अभिनेत्री हेमांगी कवी नवऱ्यापासून लपूनछपून करते नको ते काम! सोशल मीडियावर स्वतःच केला मोठा खुलासा
'आरआऱआर' या चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील काही कलाकारांचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळातील स्थितीवर आधारिर दाखवण्यात आली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण या चित्रपटात स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे बजेट सुमारे 450 कोटी आहे. त्याचबरोबर पॅन स्टुडिओने या चित्रपटासाठी उत्तर भारतातील सर्व चित्रपटगृहांचे अधिकार प्राप्त केले आहेत.
हे वाचा - 'कंगनाने करणविरोधात वाईट बोलण्यास सांगितले...' पुरावे असल्याचं सांगत KRK चा दावा
यापूर्वी चित्रपटाची रिलीज डेट 13 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती, परंतु कोविड महासाथीमुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. यानंतर चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच धुमाकूळ घालायला हा चित्रपट येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Entertainment