मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aishwarya Rajinikanth: रजनीकांतच्या लेकीचे लग्नातील सोनं अन् हिऱ्याचे दागिने चोरीला; लाखोंमध्ये आहे किंमत

Aishwarya Rajinikanth: रजनीकांतच्या लेकीचे लग्नातील सोनं अन् हिऱ्याचे दागिने चोरीला; लाखोंमध्ये आहे किंमत

ऐश्वर्या रजनीकांत

ऐश्वर्या रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्याच्या लग्नातील दागिने चोरटयांनी लंपास केले आहेत. या दागिन्यांची किंमत ऐकून धक्का बसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च :  सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी आणि धनुषची माजी पत्नी ऐश्वर्याच्या लग्नातील दागिने त्यांच्या घरातून चोरीला गेले आहेत. अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती ऐश्वर्याने चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. ऐश्वर्याने तिच्या चेन्नईतील घरातील लॉकरमधून 60 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने गायब आहेत असा दावा केला आहे. या दागिन्यांची किंमत 3.60 लाख रुपये आहे. या दागिन्यांचे वजन सुमारे 60 तोळे असल्याचे सांगण्यात येत आहे. ऐश्वर्याने सांगितले की, तिने हे दागिने 2019 मध्ये तिची बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी वापरले होते.

पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ऐश्वर्याने सांगितले की, तिने दागिने घरातील लॉकरमध्ये ठेवले होते. तिच्याशिवाय इतर काही नोकरांना याची माहिती होती. तेनमपेट पोलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ऐश्वर्याने सांगितले की, तिने शेवटचे हे दागिने 2019 मध्ये तिच्या बहिणीच्या लग्नात वापरले होते, जे आता गायब आहेत.

'आशिकी' फेम अभिनेता दीपक तिजोरीला 2.6 कोटींचा गंडा; निर्मात्यावर केले गंभीर आरोप

ऐश्वर्याने सांगितले की, जेव्हा तिने 10 फेब्रुवारी 2023 रोजी लॉकर उघडले तेव्हा त्यात तिचे लग्नाचे दागिने गायब होते. हरवलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, प्राचीन सोन्याचे तुकडे, नवरत्नम सेट, बांगड्या आणि 60 तोळे सोने असा सुमारे 3.60 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. ऐश्वर्या रजनीकांतने आपल्या तक्रारीत सांगितले आहे की, मला त्याची मोलकरीण ईश्वरी, लक्ष्मी आणि ड्रायव्हर व्यंकट यांच्यावर संशय आहे. तिघेही सेंट मेरी रोड येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये येत असत.

ऐश्वर्याने 2004 मध्ये अभिनेता धनुषसोबत लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. मोठा मुलगा यात्राचा जन्म 2006 मध्ये झाला. तर लहान मुलगा लिंगाचा जन्म 2010 मध्ये झाला. गेल्या वर्षी 2022 मध्ये, 17 जानेवारी रोजी ऐश्वर्या आणि धनुषने दोघेही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्यांचा हा निर्णय ऐकून सगळ्या चाहत्यांना धक्का बसला होता.

वर्कफ्रंटवर, ऐश्वर्या 'लाल सलाम'मधून दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. तर वडील रजनीकांत या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, South actress