कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या करणार 'देवदास'चं प्रमोशन

कान फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या करणार 'देवदास'चं प्रमोशन

यावर्षी ऐश्वर्यासोबत सोनम कपूर, दीपिका पदुकोणही कान फिल्म फेस्टिवलला जाणार आहेत.

  • Share this:

15 मे : ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा 'देवदास'चा जलवा कान फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवायला तयार झालीय. याआधी 2002मध्ये देवदास सिनेमाचं स्क्रीनिंग कान फेस्टिवलमध्ये करायला ती गेली होती. आता लो रियालची ब्रँड अँबेसिडर म्हणून पॅरिसला चाललीय. 20 मे रोजी ओपन सिनेमा सेक्शनमध्ये देवदास दाखवला जाणारेय.

ऐश्वर्या राय भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमली. ती म्हणाली, 'तो अनुभव खासच होता. आम्ही तिघंही घोडागाडीत बसून रेड कार्पेटवर आलो होतो. तो क्षण खासच होता. '

यावर्षी ऐश्वर्यासोबत सोनम कपूर, दीपिका पदुकोणही कान फिल्म फेस्टिवलला जाणार आहेत. सोनम अनेक वेळा रेड कार्पेटवरून गेलीय. दीपिकाचं हे दुसरं वर्ष. 2010मध्ये पहिल्यांदा दीपिका कान फिल्म फेस्टिवलमध्ये आली होती.

कान फिल्म फेस्टिवल 17 मे ते 20 मेपर्यंत आहे. ऐश्वर्या 19 आणि 20 मे रोजी रेड कार्पेटवर दिसेल. गेल्या वर्षी 'सरबजीत'साठी ऐश्वर्या कानला गेली होती. त्यावेळी तिचं पर्पल लिपस्टिक चर्चेत होतं.

First published: May 15, 2017, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading