अ‍ॅक्टिंग सोडून ऐश्वर्या राय-बच्चन आता करणार 'हे' काम

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असलेली ऐश्वर्या राय-बच्चन सध्या सिनेमांपासून दूर असली तरीही तिची लोकप्रियता किंचितशीही कमी झालेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 04:29 PM IST

अ‍ॅक्टिंग सोडून ऐश्वर्या राय-बच्चन आता करणार 'हे' काम

बॉलिवूड सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असलेली ऐश्वर्या राय-बच्चन सध्या सिनेमांपासून दूर असली तरीही तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या करणाने चर्चेत असते.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असलेली ऐश्वर्या राय-बच्चन सध्या सिनेमांपासून दूर असली तरीही तिची लोकप्रियता किंचितशीही कमी झालेली नाही. ती कोणत्या-ना-कोणत्या करणाने नेहमीच चर्चेत असते.


मागच्या काही दिवसांपासून ऐश्वर्या दिग्दर्शिक संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध कवी आणि लेखक साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन सोबत ऐश्वर्यासुद्धा काम करणार असल्याचं बोललं जात आहे.

दिग्दर्शिक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात ऐश्वर्या दिसणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. प्रसिद्ध कवी आणि लेखक साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चनसोबत ऐश्वर्यासुद्धा काम करणार असल्याचं बोललं जात आहे.


पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. ऐश्वर्याच्या त्या विधानावरून लवकरच ती अभिनय सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं केलेल्या एका वक्तव्यामुळे ती सध्या भलत्याच चर्चेत आहे. ऐश्वर्याच्या 'त्या' विधानावरून लवकरच ती अभिनय सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Loading...


एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्यानं तिला दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली. अभिनय क्षेत्रात नशीब आजमवल्यानंतर आता ऐश्वर्याला सिनेमाचं दिग्दर्शन करायचं आहे. ऐश्वर्या सांगते, मी अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे. मात्र एवढी वर्ष मी फक्त अभिनय केला. मी नेहमीच एका टीम प्लेअर राहिले आहे. माझ्या सर्व सहकलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांना एकत्र काम करताना पाहिलं मात्र आता मला त्यातील एक भाग व्हायचं आहे.

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्यानं तिला दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली. अभिनय क्षेत्रात नशीब आजमवल्यानंतर आता ऐश्वर्याला सिनेमाचं दिग्दर्शन करायचं आहे. ऐश्वर्या सांगते, 'मी अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे. मात्र एवढी वर्ष मी फक्त अभिनय केला. मी नेहमीच एक टीम प्लेअर राहिले आहे. माझ्या सर्व सहकलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना एकत्र काम करताना पाहिलं मात्र आता मला त्यांच्यातीलच एक भाग व्हायचं आहे'.


काही दिवसांपूर्वी मणिकार्णिकाचं दिग्दर्शन करणारी कंगणा रनौत याच गोष्टीमुळे बराच काळ चर्चेत राहीली. त्यानंतर आता ऐश्वर्या देखील या क्षेत्रात उतरून पडद्यावर नाही तर पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावण्याची तयारी करत आहे.

काही दिवसांपूर्वी मणिकर्णिकाचं दिग्दर्शन करणारी कंगणा रानौत याच गोष्टीमुळे बराच काळ चर्चेत राहिली. त्यानंतर आता ऐश्वर्यादेखील या क्षेत्रात उतरून पडद्यावर नाही तर पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावण्याची तयारी करत आहे.


त्यामुळे आता अभिनयातील यशस्वी करिअर नंतर ऐश्वर्या निर्मिती किंवा दिग्दर्शन क्षेत्रात उतरून स्वतःला कशी सिद्ध करणार हे पाहणं तिच्या चाहत्यासांठी उत्सुकतेचं असणार आहे.

त्यामुळे आता अभिनयातील यशस्वी करिअरनंतर ऐश्वर्या निर्मिती किंवा दिग्दर्शन क्षेत्रात उतरून स्वतःला कशी सिद्ध करणार हे पाहणं तिच्या चाहत्यासांठी उत्सुकतेचं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...