बच्चन कुटुंबियांची ख्रिसमस पार्टी दणक्यात; ऐश्वर्याया लेकीसोबत PHOTO शेअर करत म्हणाली...

बच्चन कुटुंबियांची ख्रिसमस पार्टी दणक्यात; ऐश्वर्याया लेकीसोबत PHOTO शेअर करत म्हणाली...

बच्चन कुटुंबियांच्या घरी ख्रिसमस डिनरचं (Christmas Dinner) आयोजन केलं होतं. तिथला आराध्या (Aaradhya) आणि ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) फोटो व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर: अनेक सेलिब्रिटींनी नाताळचा सण दणक्यात साजरा केला. बच्चन कुटुंबियांच्या घरीदेखील नाताळची मोठी पार्टी रंगली. यावेळी सगळं बच्चन कुटुंब उपस्थित होतं. कोरोनामुळे बरेच दिवस घरामध्ये अडकून पडलेले सेलिब्रिटी आता कुटुंबासोबत का होईना एकत्र येऊन पार्टीचा आनंद घेत आहेत. या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने लेकीसोबत एक फोटो शेअर केला आहे.

ऐश्वर्याने लेकीसोबत फोटो शेअर करत सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये ऐश्वर्या लाल रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तर आराध्याने लाल रंगाचाच स्वेटर घातला आहे. या फोटोमध्ये मायलेकी अतिशय क्यूट दिसत आहेत. बच्चन कुटुंबियांच्या ख्रिसमस पार्टीला जया बच्चन (Jaya Bachchan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या (Aishwarya), आराध्या (Aaradhya), अभिषेक (Abhishek Bachchan), श्वेता बच्चन – नंदा, नव्या नवेली, अगस्त असा सगळा परिवार उपस्थित होता.

ऐश्वर्या राय –बच्चन सध्या सिनेमांपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसंच नोव्हेंबर महिन्यात तिने आराध्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला होता. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही महिन्यांपूर्वी संपूर्ण बच्चन कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह झालं होतं. बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते सगळे पूर्णपणे बरे झाले.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 26, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या