Home /News /entertainment /

ऐश्वर्यानं ‘कुछ कुछ होता है’ला दिला होता नकार; करायचं नव्हतं शाहरुखसोबत काम

ऐश्वर्यानं ‘कुछ कुछ होता है’ला दिला होता नकार; करायचं नव्हतं शाहरुखसोबत काम

हा चित्रपट बॉलिवूडसाठी जणू मैलांचा दगडच ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल या चित्रपटासाठी दिग्दर्शक करण जोहरनं ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) विचारलं होतं.

    मुंबई 14 मार्च: ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 1998 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल (Shah Rukh Khan, Rani Mukherjee and Kajol) यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळं हा चित्रपट बॉलिवूडसाठी जणू मैलांचा दगडच ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल या चित्रपटासाठी दिग्दर्शक करण जोहरनं ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) विचारलं होतं. परंतु तिनं शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारण्यास थेट नकार दिला होता. अवश्य पाहा - पाहा मराठी कलाकारांचे आगळे वेगळे Video; स्वीकारलं ‘साऊथ डान्स चॅलेंज’ वाचा काय होता तो किस्सा? कुछ कुछ होता है या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं होतं. तो जवळपास एक वर्ष अभिनेत्रीच्या शोधात होता. या चित्रपटासाठी त्यानं ट्विंकल खन्ना, करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि ऐश्वर्या राय यांना विचारलं होतं. परंतु यापैकी कुठल्याच अभिनेत्रीनं चित्रपटात काम करण्यास होकार दिला नाही. काही अभिनेत्री इतर चित्रपटांमध्ये व्यस्त होत्या. तर काहींना पटकथा आवडली नाही. अपवाद फक्त ऐश्वयाच होती. तिला पटकथा प्रचंड आवडलं होती. परंतु शाहरुख खानच्या पत्नीची भूमिका मात्र साकारण्यास ती तयार नव्हती. अखेर या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला विचारण्यात आलं अन् ती टीना म्हणून चित्रपटात झळकली. या सुपरहिट चित्रपटानंतर राणी मुखर्जी रातोरात लोकप्रिय अभिनेत्री झाली. ऐश्वर्यानं अलिकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत या नकारामागील कारण सांगितलं. ती म्हणाली, “त्यावेळी मी नवी अभिनेत्री होते. मला चित्रपटांमध्ये अभिनय करायचा होता. केवळ हिरोमागे उभं राहून सुंदर दिसायचं नव्हतं. जर त्या व्यक्तीरेखेत खरंच दम असता तर मी होकार दिला असता. पण ती भूमिका मला आवडली नाही. त्यामुळं मी नकार दिला.”
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या