• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Paris Fashion Week मध्ये ऐश्वर्या रायने दाखवली जादू; फॅन्स म्हणाले, परी म्हणू की सुंदरा

Paris Fashion Week मध्ये ऐश्वर्या रायने दाखवली जादू; फॅन्स म्हणाले, परी म्हणू की सुंदरा

Paris Fashion Week मध्ये ऐश्वर्या रायने दाखवली जादु; फॅन्स म्हणाले परी म्हणु की सुंदरा

Paris Fashion Week मध्ये ऐश्वर्या रायने दाखवली जादु; फॅन्स म्हणाले परी म्हणु की सुंदरा

बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) एक उत्तम अभिनेत्री सोबत एक मॉडेल सुद्धा आहे. ती नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर तिच्या पॅरिस फॅशन वीकची (Paris Fashion Week)चर्चा जोरदार रंगली आहे.

 • Share this:
  मुंबई, 04 ऑक्टोबर : बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) एक उत्तम अभिनेत्री सोबत एक मॉडेल सुद्धा आहे. ती नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर तिच्या पॅरिस फॅशन वीकची (Paris Fashion Week)चर्चा जोरदार रंगली आहे. पॅरिसमधील फॅशन वीक 2021 मध्ये रॅम्प वॉकवर ऐश्वर्या राय व्हाइट कलरचा आउटफिट परिधान करुन उतरली होती. ऐश्वर्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या रॅंप वॉक करताना दिसत आहे. Image वयाची चाळीशी उलटूनही ऐश्वर्या आजही आपल्या मोहक रुपाने सर्वाच्या मनावर राज्य करत असते. 'मोकळे केस, न्यूड मेकअप आणि व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये' ऐश्वर्याच मोहक रुप अधिकच खुलून आले आहे. Image ऐश्वर्याच्या हा लुक केवळ चाहत्यांच्याच नाहित तर सेलेब्सच्याही पसंतीस चांगलाच उतरला आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडत आहे. या रॅम्प वॉकमध्ये ऐश्वर्या राय ब्रिटिश स्टार हेलन मिरेनसोबत हातात हात घालून चालताना दिसली. Image Image यानंतर, गायिका-अभिनेत्री कॅमिला कॅबेलो, ऑस्ट्रेलियन स्टार कॅथरीन लँगफोर्ड, 'हाऊ टू गेट अवे विथ मर्डर' फेम अभिनेत्री अजा नाओमी किंग, हॉलिवूड स्टार अंबर हर्ड आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' अभिनेता निकोलाज कॉस्टर-वाल्डो ऐश्वर्या रायसोबत रॅम्प वॉक करतात दिसल्या. या सर्व स्टार्सनी रॅम्पवर एकत्र येऊन संपूर्ण शो हादरवून टाकला. Image याशिवाय ऐश्वर्या रायचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याने पॅरिसचे सुंदर दृश्य दाखवले आहे. ऐश्वर्या रायच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या राय शेवटची 'फन्ने खान' चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर, आजकाल ती तिच्या तामिळ चित्रपटासाठी प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे. ती लवकरच 'पोन्नीयन सेल्वान' आणि 'गुलाब जामुन' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: