मुंबई, 14 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि पती अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या कपलची मुलगी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या (Aaradhya Bachchan) सध्या चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये तिनं कविता म्हटली आहे. आराध्याचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून नेटकऱ्यांध्ये नातीच बिग बींच्या पावलावर पाऊल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आराध्या हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे असं सांगते. हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर आराध्याचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. आराध्या बच्चनचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर असलेल्या फॅन पेज अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ आराध्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतील आहे. तर ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचे भाषेवर असलेले प्रभुत्व हे आजोबा अमिताभ आणि पंजोबा हरिवंश राय बच्चन यांच्यामुळे असल्याचे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी, आराध्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये तिने 'ख्रिसमस'चा अर्थ सांगून चाहत्यांना खास संदेश दिला आहे. या व्हिडीओमध्ये रेड कलरच्या ड्रेस परिधान केला असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai