मुंबई 16 ऑगस्ट: लग्नसोहळे सगळीकडेच होत असतात पण बॉलिवूड कलाकार, बडे राजकीय नेते, उद्योगपती, सेलेब्रिटी यांच्या विवाह सोहळ्यांत मात्र झगमगाट असतो. तिथं कुणी काय कपडे घातले इथपासून ते कोणता विधी कसा पार पडला इथपर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता सामान्य माणसांना असते. याचे किस्सेही खूप चर्चेत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन सतत चर्चेत असतात. ऐश्वर्या सध्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नीयन सेल्वान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मणिरत्नम दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यातच सध्या ऐश्वर्याची मुलगी तिच्या एका कृत्यामुळे अत्यंत चर्चेत आली आहे. आजकालची लहान मुलं फारच चाणाक्ष आणि हुशार असतात. त्यांना लहान वयातच बऱ्याच गोष्टी सहज समजतात. मोठ्या लोकांची आपुलकीने विचारपूस करतात. आराध्या सुद्धा अत्यंत हुशार व चाणाक्ष आहे. त्याचबरोबर तिच्यामध्ये सामंजसपणा आणि आपुलकीही आहे. त्याचं दर्शन अलीकडेच सर्वांना घडलं आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये आराध्याच्या ज्या मावशीचं लग्न आहे ती रडताना आणि आराध्या तिला समजावताना दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी (Star kids) एक आहे. आराध्याला आपण अनेकदा तिची आई ऐश्वर्यासोबत लग्न आणि बाकी समारंभामध्ये पाहत असतो. तिनं आजवर नेहमीच आपल्या साधेपणा आणि क्यूटनेसने (Cuteness) चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या ऐश्वर्याच्या कझिनच्या (Cousin) (चुलत किंवा मावस बहीण) म्हणजे श्लोका शेट्टीच्या लग्नाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हे लग्न फेब्रुवारी 2021मध्ये झालं आहे. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या लग्नात ऐश्वर्याने सहकुटुंब हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्याने अतिशय सुंदर लाल लेहेंगा परिधान केला होता.
मोदी की इंदिरा गांधी, सर्वात शक्तिशाली पंतप्रधान कोण? अजय देवगणनं दिलं हे उत्तर
View this post on Instagram
नुकताच समोर आलेला व्हिडिओ हा श्लोकाच्या लग्नानंतर ती सासरी जातानाचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, श्लोका तिच्या आईला मिठी मारते आणि रडू लागते. त्यानंतर श्लोका तिची बहीण ऐश्वर्या आणि भाची आराध्याकडे जाते. तेव्हा आराध्या रडणाऱ्या श्लोकाला प्रेमाने शांत करत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, श्लोका आंटी रडू नका, मी इथे आहे ना. आराध्याकडून हे ऐकून तिथे असणारे सर्वजण भारावून गेले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य आले. आराध्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे.
हा व्हिडिओ आणि काही फोटो मोंक्स इन हॅपीनेस नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. यावर चाहते भरभरून व्यक्त होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. आराध्याचं कौतुक करत आहेत. खरंतर असं म्हणतात की, लहान मुलांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तसाच एक परिपाठ आराध्याने आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai, Amitabh Bachchan, Video viral