'2.0'मध्ये 'या' रूपात असणार ऐश्वर्या राय बच्चन

2.0 येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होतोय. सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन आहे की नाही याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. ऐश्वर्या सिनेमात असेल पण...

News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2018 11:44 AM IST

'2.0'मध्ये 'या' रूपात असणार ऐश्वर्या राय बच्चन

मुंबई, 24 नोव्हेंबर : रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहुचर्चित '2.0' सिनेमा पाच दिवसांनंतर रिलीज होतोय. हा सिनेमा रोबोटचा सीक्वल आहे. त्यामुळे या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन असेल अशा बातम्या येत होत्या.


आता नवी बातमी कळलीय. या सिनेमात ऐश्वर्या नाही. पण रजनीकांतची व्यक्तिरेखा वारंवार ऐश्वर्याचा उल्लेख करतं. कारण रोबोटमध्ये ऐश्वर्याची महत्त्वाची भूमिका होती. 2.0चा दिग्दर्शक शंकरनं सांगितलं, हा सिनेमा ऐश्वर्याच्या उल्लेखाशिवाय बनूच शकत नाही. त्यामुळे सिनेमाभर तिच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख असेल.


या सिनेमाची पोस्टर्स आतापर्यंत शेअर झाली होती. पण आता अक्षय कुमारचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ बाहेर आलाय. तो बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. एखाद्या अभिनेत्याची मेहनत किती असू शकते, हे यातून समजून येते.

Loading...


एका मुलाखतीत अक्षय कुमारनं या मेकअपबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, 'या व्यक्तिरेखेसाठी मी जेवढा मेकअप केलाय, तेवढा आतापर्यंत कधीच केला नाही. मेकअपलाच मला 4 तास लागायचे. पुन्हा तो काढण्यासाठी अडीच तास जायचे. ' अक्षय या सिनेमात खलनायकाची भूमिका करतोय.


अक्षय आणि रजनीकांतचा हा '2.0' सिनेमा रोबोटचा सिक्वल आहे. रजनीकांत यात डबल रोलमध्ये आहे, तर अक्षय खलनायक आहे. 400 कोटींचा बनलेला हा सिनेमा भारतातला सर्वात महागडा सिनेमा आहे.


काही दिवसांपूर्वी रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0' सिनेमातल्या एमी जॅक्सनचा लूक रिलीज झाला होता. . या पोस्टरमध्ये एमी रोबोटच्या लूकमध्ये दिसते. हा सिनेमा रजनीकांच्या 'रोबोट'चा रिमेक आहे.


एमीनं आपला लूक ट्विटरवर शेअर करत लिहिलं होतं, मी या सिनेमाचं शूट सुरू केलं, तेव्हापासून हा लूक शेअर करायची वाट पाहत होते.Photos : हाॅस्पिटलमधून नेहा धुपियाला मिळाला डिस्चार्ज, लेकीसोबत कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...