मुंबई, 06 जानेवारी : बॉलिवूडची सर्वात संदर अभिनेत्रींपैकी एक जागतिक सुंदरी असलेली एश्वर्या राय बच्चन तिच्या स्टाईल आणि फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्यावर्षी ती वेगवेगळ्या लुक आणि स्टाईलमुळे चर्चेत दिसून आली. यंदाही ऐश्वर्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत येणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऐश्वर्यानं सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर केला होता. आता तिने स्वत:च्या फोटोंनी आठवणी सजावयला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ऐश्वर्या तिच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्यानं शेअर केलेल्या या फोटोची फार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे काही तासातच फोटोला लाखोंनी लाईक आणि कमेंट मिळाल्या आहेत. ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी ही एक नवी मेजवानी आहे अस म्हणायला हरकत नाही.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्या फार छान दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या हेअरस्टाईलवर विशेष भर दिला आहे. बाजुच्या भिंतीवर असलेला चार्ली चाप्लिनचा फोटो आणखी आकर्षित करतो, चार्ली चाप्लिनप्रमाणे निरागस चेहरा करून ऐश्वर्यानं हा फोटो शेअर केला आहे.
ऐश्वर्या राय बच्चनने गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर तिच्या अकाऊंटला सुरुवात केला होती. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला तिला फार आवडतं. सतत फॅमिलीसोबतच्या पोस्ट ती शेअर करत असते. ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामवर 60 लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर कोणालाही फॉलो करत नाही. वर्षभरात तिने आत्तापर्यंत 140 पोस्ट शेअर केल्या आहेत. ऐश्वर्या राय चाहते भरपूर असल्याने लोक तिला फॉलो करतात.
Exclusive : रणवीरची कोणाला माहीत नसलेली गोष्ट सांगतेय 'गली बाॅय'मधली त्याची आई