Home /News /entertainment /

Aishwarya Rai Bachchan pregnant : ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा देतेय Good news? अभिनेत्रीचा नवा फोटो आला समोर

Aishwarya Rai Bachchan pregnant : ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा देतेय Good news? अभिनेत्रीचा नवा फोटो आला समोर

ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) नवा फोटो पाहून ती दुसऱ्यांदा आई होणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

  मुंबई, 26 जुलै : अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) नुकतीच दुसऱ्या बाळाची आई झाली. आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही (Aishwarya Rai Bachchan) दुसऱ्यांदा आई होणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे आणि याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो. या फोटोत ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai Bachchan photo)  पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. ऐश्वर्या या फोटोत प्रेग्नंट दिसत आहे (Aishwarya Rai Bachchan pregnant) . ऐश्वर्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत. या फोटोत तिच्यासोबत तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चनसुद्धा  (Aaradhya Bachchan)  आहे.
  ऐश्वर्या या फोटोमध्ये ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसते आहे. तिचं वजन वाढलेलं दिसतं आहे. शिवाय पोटही पुढे आल्यासारखं वाटतं आहे. तसंच ऐश्वर्या या फोटोत आपलं पोट लपवण्याचाही प्रयत्न करताना दिसते आहे. काही फोटोत तिने आपलं पोट दिसणार नाही, असाच प्रयत्न केला आहे. तर काही फोटोत तिने पोटावर हात ठेवला आहे. ऐश्वर्याचा हा फोटो पाहून नेटिझन्सनी ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऐश्वर्या प्रेग्नंट आहे का, याबाबत नेटिझन्सनी सोशल मीडियावर विचारणाही केली आहे. पण अद्याप बच्चन कुटुंबाकडून याबाबत काही माहिती मिळालेली नाही.  ऐश्वर्याने 2011 साली आराध्याला जन्म दिला होता. आराध्या आता 9 वर्षांची आहे. हे वाचा - ‘ताई तू मुंबई पोलिसांचा विचार कर’; राज कुंद्राला पाठिंबा देणारी गहना ट्रोल फोटोंवरून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा फोटोत ऐश्वर्याला पाहून अनेकांनी ती प्रेग्नंट असल्याची चर्चा झाली होती.  मुंबईतल्या एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही हजर होते. त्यावेळी ऐश्वर्याचा ड्रेस आणि तिची बॉडी लँग्वेज यावरून चर्चा सुरू झाली. ऐश्वर्याने लाल आणि गोल्डन कलरचा ड्रेस घातल होता. आणि तिची ओढणी ही तिच्या समोरच्या भागावर खालपर्यंत आली होती. ऐश्वर्याने बेबी बंप लपविण्यासाठीच ओढणी आपल्या पोटावर ओढून घेतल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ऐश्वर्याने कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे वाचा - ‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती त्याआधी अभिषेक आणि ऐश्वर्याचा गोव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरूनही अशीच चर्चा झाली होती. आता ऐश्वर्याच्या नव्या फोटोवरून रंगणारी चर्चा तरी खरी आहे का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Aishwarya rai, Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या