11 मे : येणार येणार म्हणता म्हणता ऐश्वर्या राय बच्चन इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर आली. आल्या आल्या तिच्या फाॅलोअर्सची संख्या झपाट्यानं वाढतेय. ऐश्वर्यानं अकाऊंटवर जुने फोटो टाकलेत. शिवाय एक कॅचलाईन टाकलीय. त्याचा अर्थ असा आहे की, मला अजून अनेक मैल प्रवास करायचाय.
ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच सोशल मीडियापासून लांब राहण्याचं पसंत केलं. पण आता ऍश यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावण्याआधीच इन्स्टाग्रामवर तिनं पदार्पण केलं.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने देखील काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai bachchan, Instagram