ऐश्वर्या राय बच्चनला घरी 'या' नावानं मारतात हाक

ऐश्वर्या राय बच्चनला घरी 'या' नावानं मारतात हाक

अभिनेत्रींचं ग्लॅमर आपण बाहेर सगळे बघत असतो. पण घरात त्यांचं वेगळं रूप असतं. तसंच आहे ऐश्वर्याचं. तिला घरी कुठल्या नावानं हाक मारली जाते, हे ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रायनं सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : नुकताच आराध्या बच्चनचा वाढदिवस जोरदार साजरा झाला. तेव्हापासून ऐश्वर्या राय बच्चन चर्चेत आहे. त्यात तिच्या वहिनीनं तिचं एक गुपित उघड केलंय.


अभिनेत्रींचं ग्लॅमर आपण बाहेर सगळे बघत असतो. पण घरात त्यांचं वेगळं रूप असतं. तसंच आहे ऐश्वर्याचं. तिला घरी कुठल्या नावानं हाक मारली जाते, हे ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रायनं सांगितलंय.


श्रीमा रायला इन्स्ट्राग्रामवर एकानं विचारलं, तुझ्या मुलांना ऐश्वर्या राय बच्चन यांची लोकप्रियता माहीत आहे का? यावर श्रीमानं सांगितलं, हे काही मी मुलांना सांगत नाही. ते ऐश्वर्याला गुलूमामी म्हणून हाक मारतात.
ऐश्वर्या-अभिषेक गुलाबजाम सिनेमात एकत्र येणार आहेत. 8 वर्षांनी दोघं एका सिनेमात काम करणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप करणार आहे. आतापर्यंत दोघांनी 10 सिनेमांंमध्ये एकत्र काम केलंय.


नुकताच ऐश्वर्याचा वाढदिवस साजरा झाला. कोणत्याही आईसाठी सर्वस्व असतं ते तिचं मूल आणि आपल्याच बाळाकडून जर आपल्याला एखादं सरप्राईज गिफ्ट मिळालं तर ते गिफ्ट सगळ्यात अनमोल गिफ्ट असतं.


ऐश्वर्या रायला तिची मुलगी आराध्याने एक अतिशय अनमोल गिफ्ट दिलंय. हे गिफ्ट म्हणजे आराध्याने स्वतःच्या हाताने आईसाठी एक खास मुकूट तयार केलाय. हा मुकूट तिने रंग, स्टिकर्स आणि चमकीच्या सहाय्याने सजवलाय.


त्यावर 'बेस्ट मॉम इन द होल वाईड वर्ल्ड' असा संदेशही तिने लिहिलाय. विश्वसुंदरी ठरलेल्या ऐश्वर्याच्या हातात जेव्हा हा मुकूट पडला तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.


या मुकुटाने तिला थेट 1994ची आठवण करून दिली. त्यावेळी झालेल्या जागतिक सौंदर्यस्पर्धेत सहभागी होताना ऐश्वर्याची आई वृंदा राय यांनी तिच्यासाठी फार मेहनत घेतली होती.Photos : बॉलिवूडच्या बेबोने का नेसली सफेद साडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 12:15 PM IST

ताज्या बातम्या