...आणि ऐश्वर्याचा हात धरुन स्टेजवर घेऊन गेला अभिषेक, पाहा धमाकेदार डान्स VIDEO

...आणि ऐश्वर्याचा हात धरुन स्टेजवर घेऊन गेला अभिषेक, पाहा धमाकेदार डान्स VIDEO

या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात या त्यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या सर्वात हिट जोड्यांपैकी एक आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांची केमिस्ट्री सोशल मीडियावरही पाहायला मिळते. अनेकदा मुलाखतींमध्ये ऐश्वर्या अभिषेकच्या साध्या स्वभावाचं कौतुक करताना दिसते. दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो सुद्धा शेअर करताना दिसतात. पण आता या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात या दोघांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोणत्यातरी अवॉर्ड फंक्शनमधील आहे. ज्यात अभिषेक परफॉर्म करत होता. पण अचानक अभिषेक स्टेजवरून उतरुन खाली जातो आणि तिथे बसलेल्या ऐश्वर्याचा हात धरुन तिला स्टेजवर घेऊन येतो. त्यानंतर दोघं मिळून ‘धूम 2’ सिनेमाच्या गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ जुना असला तरीही सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सलमान खानच्या अडचणीत वाढ; अक्षय कुमार ठरला कारण, वाचा नक्की काय घडलं

सोशल मीडियावर या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहे. काहींनी ऐश्वर्या अभिषेकचा हा डान्स प्लान होता असं म्हणत ऐश्वर्याला ट्रोल केलं आहे. तर काहींनी मात्र ऐश्वर्याची बाजू घेत जर तिच्याच सिनेमातील गाणी आहेत तर तिला तिच्या गाण्याच्या डान्स मूव्ह्स येणार नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्यानं डान्स केलेली सर्व गाणी ही त्यांच्याच ‘धूम 2’ या सिनेमातील आहे.

'कमल हसन यांनी मला जबरदस्तीनं KISS केलं होतं', अभिनेत्री रेखा यांचा आरोप

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची 'फन्ने खाँ' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिनं अनिल कपूर आणि राज कुमार राव यांच्यासोबत बेबी सिंहची भूमिका साकारली होती. याशिवाय तिनं रणबीर कपूरसोबत ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात काम केलं होतं. लवकरच ती एका तमिळ सिनेमात काम करताना दिसणार आहे.

VIDEO : SidNaaz पाहून शहनाझ गिल भडकली, रागात जाळून टाकले सर्व गिफ्ट

First published: February 26, 2020, 5:00 PM IST

ताज्या बातम्या