कोरोना पॉझिटिव्ह ऐश्वर्या राय, आराध्यादेखील नानावटी रुग्णालयात; दिसू लागली तापाची लक्षणं

कोरोना पॉझिटिव्ह ऐश्वर्या राय, आराध्यादेखील नानावटी रुग्णालयात; दिसू लागली तापाची लक्षणं

ऐश्वर्या राय बच्चनमध्ये (Aishwarya Rai Bachchan) कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत.

  • Share this:

आशिष सिंह/मुंबई, 17 जुलै : कोरोना पॉझिटिव्ह (coronavirus) अभिनेते अमिताभ बच्चन (amitabh bachchan), अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ऐश्वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तिला हलका ताप आला आहे. त्यानंतर ऐश्वर्यासह आराध्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर आधीपासूनच नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

11 जुलैला रात्री बिग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली.

हे वाचा - "तुमचे खूप आभार मानायचे आहेत पण...", चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेले अमिताभ यांनी व्यक्त केली खंत

12 जुलैला ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याला सुरुवातीला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. आता त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान बच्चन कुटुंबाला लवकरात लवकर बरं वाटावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांनी या सर्व चाहत्यांचे आभार मानलेत.

Published by: Priya Lad
First published: July 17, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading