बर्थडे स्पेशल - 'म्हणून' ऐश्वर्या नाही साजरा करणार वाढदिवस..

ऐश्वर्या तिचा वाढदिवस नेहमी बॉलिवूड स्टार्स सोबत जोरदार पद्धतीने साजरा करते, पण या वर्षी ती वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा करत नाही आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2017 12:02 PM IST

बर्थडे स्पेशल - 'म्हणून' ऐश्वर्या नाही साजरा करणार वाढदिवस..

01 नोव्हेंबर: आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज 44वा वाढदिवस आहे. 44 वर्षांची 'अॅश' सिनेसृष्टीत सगळ्यात सूंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्या तिचा वाढदिवस नेहमी बॉलिवूड स्टार्स सोबत जोरदार पद्धतीने साजरा करते, पण या वर्षी ती वाढदिवस नेहमीप्रमाणे साजरा करत नाही आहे.

ऐश्वर्या रायचा बर्थडे म्हटलं की सोशल मीडियावरही त्याची चांगलीच चर्चा होते. पण या वर्षी तिच्या वाढदिवसाचा काही बोलबाला नाही आहे कारण आहे तिचे वडिल कृष्णाराज राज यांच निधन झालं आहे. याच वर्षी कृष्णाराज राय यांचे निधन झाले. त्यामुळे ऐश्वर्या दु:खी आहे.

खरंतर तिला तिचा वाढदिवस साजराच करायचा नव्हता. पण तिच्या आईने तिला वाढदिवस साजरा कर अशी गळ घातल्याने ती घरच्या घरीच अगदी साध्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघांनी ऐश्वर्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे. अभिषेक आणि आराध्याने ऐश्वर्याचा आवडता केक ऑर्डर केला आहे. हे सेलिब्रेशन बच्चन परिवार संध्याकाळी करणार आहे. ऐेश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेक कलाकरांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्याकडूनही ऐश्वर्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...