कधीच रिलीज होऊ शकला नाही ऐश्वर्याचा हा सिनेमा, 23 वर्षांनी होतोय Video Viral

कधीच रिलीज होऊ शकला नाही ऐश्वर्याचा हा सिनेमा, 23 वर्षांनी होतोय Video Viral

ऐश्वर्याचा हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही. मात्र तिचा व्हिडीओ मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही सिनेमात दिसलेली नाही. पण तिचा स्टारडम आजही कायम आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हारल होताना दिसत आहे. ज्यात ऐश्वर्या एका सुंदर लेहंग्यात डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ 23 वर्षांपूर्वीचा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला ऐश्वर्याचा हा व्हिडीओ बिहाइंड द सीन्सचा आहे. 23 वर्षांपूर्वी शूटिंगला सुरुवात झालेला ऐश्वर्याचा हा सिनेमा कधीच रिलीज होऊ शकला नाही. मात्र तिचा हा व्हिडीओ मात्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ आहे ऐश्वर्या राय आणि सुनिल शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा राधेश्याम सीतारामचा आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला गाणं ऐकू येत आहे आणि ऐश्वर्या पर्पल कलरचा लेहंगा आणि जड ज्वेलरी घालून नाचताना दिसत आहे.

जितेंद्र यांना करायचं होतं हेमा मालिनीशी लग्न, पण गर्लफ्रेंडनं घातला गोंधळ आणि..

ऐश्वर्याच्या या सिनेमाचं शूटिंग 1997 मध्ये सुरू करण्यात आलं होतं मात्र काही कारणानं ते थांबवण्यात आलं आणि तिचा हा सिनेमा पुन्हा कधीच रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमात ऐश्वर्या आणि सुनिल शेट्टी यांच्या व्यतिरिक्त परेश रावल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. ऐश्वर्या आणि सुनिल यांचा हा पहिला सिनेमा होता. जो रिलीज झाला नाही. पण त्यानंतर या दोघांनी 2004 'क्यूं! हो गया ना' आणि 2006 'उमराव जान' या दोन सिनेमात एकत्र काम केलं.

टायगर श्रॉफच्या बहिणीचं झालं ब्रेकअप? बॉयफ्रेंडसोबतच्या बोल्ड फोटोंची होती चर्चा

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या फॅशन डिझायनर एश्ले रेबेलोनं शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली होती. एश्ले हा सलमान खानचा सुद्धा डिझायनर आहे. त्यानं काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यातील इंडियन आणि वेस्टर्न आउटफिट्समध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, बऱ्याच वर्षांपूर्वीचं ऐश्वर्या रायचं हे फोटोशूट. ही फोटोशूट 15 वर्षांपूर्वी झालं होतं.

लॉकडाउनमध्ये दिसला सनी लिओनीचा हॉट अंदाज, शेअर केले BOLD PHOTOS

First published: April 7, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading