मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Satvya mulichi satavi mulagi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'हे' कलाकार साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Satvya mulichi satavi mulagi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'हे' कलाकार साकारणार महत्वपूर्ण भूमिका

satavya mulichi satavi mulagi

satavya mulichi satavi mulagi

झी मराठीवर 12 सप्टेंबरपासून 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण आता इतर कलाकारांची नावेही समोर येत आहेत.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 19 ऑगस्ट : झी मराठीवर सध्या नवीन मालिकांचा सपाटा सुरु आहे. एकामागे एक नवीन मालिका सुरु होत आहेत. जुन्या मालिकांचा टीआरपी घसरल्याने जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतायत त्याबरोबर नवीन मालिका सुरु होत आहेत.  'बस बाई बस', 'डान्स महाराष्ट्र डान्स', 'नवा गडी नवं राज्य' आणि 'तु चाल पुढं' या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काहीच दिवसात 'आप्पी आमची कलेक्टर' ही मालिका देखील येऊ घातली आहे.त्यातच आता 12 सप्टेंबरपासून 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही नवी कोरी, नवा विषय असलेली मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता नवीन कलाकारांची नावे समोर आली आहेत. झी मराठीवर 12 सप्टेंबरपासून 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्येम या मालिकेत आता अजिंक्य ननावरे आणि ऐश्वर्या नारकर यांच्याही प्रमुख भूमिका असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram

A post shared by (@marathiserials_official)

अजिंक्य ननावरे याने  अलीकडेच 'पावनखिंड' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तसेच तो सोनी मराठीवरील 'कुसुम' या मालिकेत दिसला होता. आता तो झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्याबरोबरच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर देखील दिसणार आहे. ऐश्वर्या अलीकडेच 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' या मालिकेत ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसली होती. तीही या मालिकेत महत्वाची  भूमिका साकारणार आहे. हेही वाचा - Devmanus 2 : असा होणार 'देवमाणूस 2' चा शेवट; मालिका उत्कंठावर्धक वळणावर अभिनेत्री तितिक्षा तावडे हिनं  सरस्वती या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. नंतर 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत तिने काम केलं. त्यानंतर 'एक थ्रीलर नाइट' आणि 'जयंती' या सिनेमामधून तितिक्षा प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकतीच तीने  सोनी मराठीवरील  'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा साकारली होती. आता तिला पुन्हा नवीन भूमिकेत पाहायला चाहते उत्सुक झालेत. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका येत्या 12 सप्टेंबरपासून झी मराठीवर रात्री 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. याचाच अर्थ झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून सातव्या मुलीची सातवी मुलगी ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या