नात आणि सुनेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महानायकाला कोसळलं रडू! मानले देवाचे आभार
सुनबाई ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि नात आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांना रडू कोसळले आहे. त्यांनी त्यासंदर्बात ट्वीट देखील केले आहे.
मुंबई, 28 जुलै : बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) या दोघी कोरोनामुक्त झाल्या आहेत. आराध्या आणि ऐश्वर्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दोघीही आता जलसामध्ये (jalsa) पोहोचल्या आहेत. दरम्यान सुनबाई आणि नातीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांना रडू कोसळले आहे. त्यांनी त्यासंदर्बात ट्वीट देखील केले आहे.
12 जुलैला ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 17 जुलैला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसू लागल्याने दोघींनाही 17 जुलैला दोघींनाही मुंबईतील नानावटी रुग्णालयात (nanavati hospital) दाखल करण्यात आलं होतं. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट आता नेगेटिव्ह आला आहे. अभिषेक बच्चन याने ट्वीटवरून ही माहिती दिली होती.
Thank you all for your continued prayers and good wishes. Indebted forever. 🙏🏽
Aishwarya and Aaradhya have thankfully tested negative and have been discharged from the hospital. They will now be at home. My father and I remain in hospital under the care of the medical staff.
त्यांनी सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केली आहे की, 'आमची छोटी मुलगी आणि सुनबाई रुग्णालयातून गेल्यानंतर मी माझ्या अश्रूंना अनावर नाही घालू शकलो. देवा तुझी कृपा अपरंपार आहे.' अशा भावुक शब्दात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत.
याआधी त्यांनी ट्विटरवरून ऐश्वर्या-आराध्याला डिस्चार्ज मिळाल्या संदर्भात ट्वीट देखील केले होते. ऐश्वर्या आणि आराध्या आता जलसा बंगल्यावर पोहोचल्या आहेत. कालच मुंबई महापालिकेनं जलसावरील कंटेनमेंट झोनचा बोर्ड काढला होता. जलसाला कंटेनमेंट झोनमुक्त परिसर म्हणून घोषित केलं होतं. बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यानंतर जलसाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
11 जुलै रोजी अमिताभ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या तिघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दरम्यान आता आराध्या आणि ऐश्वर्याचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने बच्चन कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान अमिताभ आणि अभिषेक यांचेही अहवाल लवकरच निगेटिव्ह यावेत, याकरता चाहते वर्गाकडून अनेक प्रार्थना करण्यात येत आहेत. अमिताभ यांनी वेळोवेळी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांचे आभार मानले आहेत. नानावटी रुग्णालयामध्ये या दोघांवर उपचार सुरू आहेत.