नवी दिल्ली, 14 मार्च: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हणून ओळखले जाते. आमिरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. अशातच आमिर दरवर्षी आपला वाढदिवस माध्यमांसोबत साजरा करतो. या दरम्यान, आमिर मोकळेपणानं बोलतो, त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलतो. मात्र, यंदा त्याने माध्यमांशी बोलताना त्याने वैयक्तिक जीवनावर आपले मत मांडले आहे.
चार वर्षानंतर आमिरने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे. त्याने यावेळी त्याला सर्वात जास्त कशाची भिती वाटते याचा खुलासा न्यूज18 इंडियाशी संवात साधताना केला आहे.
मुलाखतीदरम्यान आमिर खान म्हणाला, 'जगातील माझी सर्वात मोठी भीती माझ्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याची. हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती आहे. त्यामुळे कोविडच्या वेळी मी त्या भीतीने जगत होतो. माझे कुटुंबीय, माझे जिवलग आणि जे माझे मित्र आहेत, त्यांच्यापासूनच माझा विचार सुरू झाला. मी 57 वर्षांचा आहे. मी 56 वर्षांचा होतो. मी त्याच्याबद्दल अधिक विचार करू लागलो, नंतर ती गोष्ट अधिकाधिक पक्की होत गेली की कदाचित माझ्या बाबतीत काही गोष्टी घडल्या असतील, ज्या कदाचित मला या वेळी बदलाव्या लागतील.
मी 18 वर्षांचा असताना काम करायला सुरुवात केली. मी माझे काका यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि 18 वर्षापासून आजतागायत मी चित्रपट जगात स्वतःला झोकून दिले आहे. याच गोंधळात मी हरवून गेलो आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीची उत्सुकता असते म्हणजे तुम्ही ते काम करता. आणि आपल्या कामावर मनापासून प्रेम करता. परंतु तुम्ही तुमच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या सांभाळा, मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे ते फॉलो शकता. असा सल्लाही आमिरने यावेळी दिला.
तसेच तो पुढे म्हणाला, मला वाटते की मी काही जबाबदाऱ्या पार पाडू शकलो नाही. या वेडात कुठेतरी मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत असं मला वाटतं. जे माझे चांगले मित्र आहेत, माझे भाऊ आणि बहीण, रीना जी, माझी पहिली पत्नी, किरण जी, रीना जीचे आई-वडील, किरण जीचे आई-वडील, माझी मुले. हे लोक जे माझ्या खूप जवळचे आहेत. आणि मी तेव्हापासून बोलत आहे. वयाच्या 18 व्या वर्षी, जेव्हा मी चित्रपटांच्या दुनियेत आल्यावर इतका गुंतलो होतो, मला इतकं शिकायचं होतं की मला काहीतरी करायचं होतं. पण आज मला वाटतं की मी त्या लोकांना भेटलोय. मात्र, त्यांना वेळ देता आला नाही. जे माझ्या खूप जवळ होते. अशी खंतदेखील आमिरने यावेळी बोलून दाखवली.
त्याच पुढे आमिर म्हणाला, 'मी त्यांना सर्वांना ज्या प्रकारे वेळ द्यायला हवा होता, तो मी त्यांना देऊ शकलो नाही, जो अनेक अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणू शकता की आतापर्यंत मी फक्त माझाच विचार करत . बहोतोघा, मी माझ्या करिअरला सुरुवात करत आहे आणि मी रात्रंदिवस काम करतो, असं कुणी म्हटलं तर प्रत्येक माणसाला ते करावंच लागेल. तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात करण्यासाठी 2-4 वर्षे घालवता. चला 5 वर्षे तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देऊ नका, कारण तुम्ही खूप व्यस्त होता. त्याच, जर तुम्ही हे 30 वर्षे केले तर ते खूप आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.