'...अशांविरोधात कायद्याचे कठोर शासन हवे', महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर संतापली कंगना

'...अशांविरोधात कायद्याचे कठोर शासन हवे', महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर संतापली कंगना

शहीद आणि समाजातील थोर व्यक्तींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ (Agrima Joshua) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर आणि समाजात निर्माण झालेले वागंद क्षमण्याचे नाव घेत नाही आहे. महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशा आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर केल्या जात आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने तिचे मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 'ज्यांना दोन पैशांचीही किंमत नाही आहे, ज्यांचा काहीच उपयोग नाही आहे असे लोक शहीदांची खिल्ली उडवतात ते केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी. हे योग्य नव्हे. नॅशनल हिरो आणि थोर व्यक्तींची मस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा असणे गरजेचे आहे', असे ट्विट करत कंगनाने या साऱ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मोठी बातमी; आता सलमानची होऊ शकते चौकशी)

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत उपहासात्मक वक्तव्य करणाऱ्या अग्रिमा जोशुआवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती. तिला बलात्काराच्या धमक्या देणारा व्हिडीओच शुभम मिश्रा या तरुणाने पोस्ट केला होता. याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करसह अनेकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान वडोदरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(हे वाचा-बच्चन कुटुंबाच्या घरापर्यंत कसा पोहोचला कोरोना? आता असा होणार तपास)

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 15, 2020, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading