VIDEO : 'शेती ईकायची नसती अशी राखायची असते'; मुळशी पॅटर्नच्या टीमसह प्रवीण तरडेची भातलावणी

VIDEO : 'शेती ईकायची नसती अशी राखायची असते'; मुळशी पॅटर्नच्या टीमसह प्रवीण तरडेची भातलावणी

प्रवीण तरडे यांच्या वडिलांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटात जमीन विकणाऱ्य़ा शेतकऱ्याची भूमिका केली आहे. मात्र प्रत्यत्रात त्यांनी एक फूटही जमीन विकली नसल्याचा अभिमान तरडे याने यावेळी व्यक्त केला

  • Share this:

मुंबई, 28 जून : सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन या काळात चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण बंद असल्याने अनेक कलाकार घरी आहेत. तर काहींनी आधीच आपआपल्या गावी धाव घेतली आहे. यादरम्यान अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

अशातच चित्रपट दिग्दर्शन प्रवीण दरडे यांनी एक फेसबुक लाइव्ह केलं आहे. त्यामध्ये ते आपल्या गावातील शेतात गुडघ्याभर पाण्यात भात लावत असताना दिसत आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी स्नेहल, वडील विठ्ठलराव तरडे व आई रुक्मिणी तरडे यांच्यासह मुळशी पॅटर्नची अख्खी टीम भातलावणी करायला शेतात उतरले आहेत.

भातलावणी करायला मजूर मिळत नसल्याने मूळशी पॅटर्नची अख्खी टीम भातलावणी करण्यासाठी बोलावली असल्याचे प्रवीण याने सांगितले. प्रवीण तरडे यांच्या वडिलांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटात जमीन विकणाऱ्य़ा शेतकऱ्याची भूमिका केली आहे. मात्र त्यांनी एक फूटही जमीन विकली नसल्याचा अभिमान तरडे याने यावेळी व्यक्त केला. आपली शेती आपण कसायची ती विकायची नाही, असा संदेश त्यांनी या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिला.

हे वाचा-Covid -19 वर आधारित चित्रपटाची निर्मिती; हा ऑस्कर विजेता करणार दिग्दर्शन

एकेकाळी मालिकालेखन करणारे प्रवीण मुळशी पॅटर्न या चित्रपटातून घराघरात पोहोचले. शेतकऱ्याला काय यातना भोगाव्या लागतात त्याचे चित्रण मुळशी पॅटर्न या चित्रपटातून करण्यात आलं आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरलं. त्या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या ह्रदयात घर केलं आहे.

 

 

First published: June 28, 2020, 8:49 PM IST

ताज्या बातम्या