अग्निशमन दलावरचा अॅक्शनपट 'अग्निपंख'

अग्निशमन दलावरचा अॅक्शनपट 'अग्निपंख'

या चित्रपटातील कलाकार कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. तरीही मिलिंद सोमण, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, गश्मिर महाजनी यांच्या नावाची चर्चा आहे.

  • Share this:

03 आॅगस्ट : ‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित झाला. फायर ब्रिगेडवर आधारित बिग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हे पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’ हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.

महाकाय अग्नितांडव असो, भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकुल परीस्थितीत करत असते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नी आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय ॲक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘अग्निपंख’ मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे.' असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला.

सिनेमासाठी अत्याधुनिक ग्राफिक्स आणि तंत्रज्ञान वापरण्यात आलंय.

या चित्रपटातील कलाकार कोण?  या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. तरीही मिलिंद सोमण, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, गश्मिर महाजनी यांच्या नावाची चर्चा आहे.

‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 05:05 PM IST

ताज्या बातम्या