मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अग्निहोत्र 3 येणार? अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा

अग्निहोत्र 3 येणार? अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा

अग्निहोत्र

अग्निहोत्र

अग्निहोत्र मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेसंबंधी महत्त्वाची घोषणा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  01 डिसेंबर :  टेलिव्हिजनवरील काही मालिका या अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. त्यातील एक मालिका म्हणजे अग्निहोत्र. स्टार प्रवाहवर सुरू झालेली ही मालिका अनेक वर्ष लोक आवडीनं  पाहत आले आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित अग्निहोत्र ही मालिका स्टार प्रवाह वाहिनी सुरू झाली त्या वेळेस सुरू झाली होती. अल्पावधीच मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. एका वाड्यातील तीन पिढ्या आणि त्यांच्या भोवती फिरणारं कथानक सर्वांच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. मालिकेच्या प्रसिद्धीमुळा मालिकेचा दुसरा भागही काढण्यात आला. अग्निहोत्र 2 ही प्रेक्षकांना आवडलं. मात्र पहिल्या भागाला तोड नाही. याच संदर्भात अभिनेते शरद पोक्षे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

शरद पोक्षे यांनी अग्निहोत्र मालिकेत महादेव काका साकारले होते. संपूर्ण मालिकेत त्यांनी उत्कृष्ट काम केलं. मुक्ता बर्वे, इला भाटे, मोहन जोशी, विक्रम गोखले, शुभांगी गोखले. स्पृहा जोशी. मृण्मयी गोडबोले, सुहास जोशी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, आस्ताद काळे, मोहन आगाशे यासारखी दमदार टीम मालिकेत होती. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतची सगळे कलाकार एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले.

हेही वाचा - हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

प्रेक्षक आजही अग्निहोत्र ही मालिका आवडीनं पाहतात. पण युट्यूबवर अग्निहोत्र मालिकेचे पूर्ण एपिसोड काही दिसत नाहीत. अनेक दिवस प्रेक्षकांची ही तक्रार आहे. अग्निहोत्र मालिका पाहणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती समोर आली आहे. अग्निहोत्री मालिकेचे संपूर्ण भाग आता स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहेत. स्वत: शरद पोंक्षे यांनी व्हिडीओ आणि पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे.

शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे की, 'बरेच वर्ष प्रेक्षक एक प्रश्न विचारत आहेत की अग्निहोत्र भाग 1चे सगळे एपिसोड युट्यूबवर का पाहायला मिळत नाहीत.  त्याचं उत्तर आता स्टार प्रवाह वाहिनीनं दिलं आहे. स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनेलवर अग्निहोत्र भाग 1चे सगळे एपिसोड अपलोड केले आहेत आणि तुम्ही आता अग्निहोत्रचे सगळे भाग पाहू शकता'.

मालिकेच्या या खुशखबरीनंतर प्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेम व्यक्त केलं आहे.  एका युझरनं म्हटलंय, 'खूपच सुंदर मालिका होती अग्निहोत्र. दमदार अभिनय व व्यक्तिरेखा साकारणारे सगळ्या कलावंतांना सलाम'.तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, 'माझी आत्तापर्यंतची सर्वात आवडती आणि आपुलकीची मालिका'. तर अग्निहोत्र 2 बद्दलही प्रेक्षकांनी प्रश्न विचारत म्हटलंय, 'अग्निहोत्र १ चे सर्व भाग उपलब्ध करून दिल्या बद्दल धनयवाद. पण अग्निहोत्र २ कधी चालू करणार? आम्ही वाट पाहत आहोत लवकर चालू करा'.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial