मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ratan Rajputh: 'त्याने मला फरफटत, 'अगले जनम मोहे बिटियाही कीजो' फेम अभिनेत्रीसोबत घडलाय धक्कादायक प्रकार

Ratan Rajputh: 'त्याने मला फरफटत, 'अगले जनम मोहे बिटियाही कीजो' फेम अभिनेत्रीसोबत घडलाय धक्कादायक प्रकार

'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'लाली' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेतील लालीची भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती.

'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'लाली' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेतील लालीची भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती.

'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'लाली' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेतील लालीची भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती.

    मुंबई, 13 ऑगस्ट-   'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली 'लाली' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेतील लालीची भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती. मालिकेच्या आगळ्यावेगळ्या विषयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. लालीची भूमिका साकारली होती अभिनेत्री रतन राजपूतने. या मालिकेने रतनला छोट्या पडद्यावरील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवून दिलं होतं. परंतु ही अभिनेत्री गेल्या अनेकदिवसांपासून पडद्यावरुन दूर आहे. आता अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे रतन पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. रतन राजपूत पडद्यापासून दूर असली तरी ती, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती स्वतः चं युट्युब चॅनेलदेखील चालवते. यामध्ये ती आपले विविध व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच रतन राजपूतचे शेतात भाताची लावण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनतर आता अभिनेत्री तिच्या लेटेस्ट व्लॉगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रतननं नुकतंच आपण नवीन फोन घेतल्याचं सांगितलं. यासोबतच आपण दिल्लीत राहून पहिल्यांदा 4 हजारांचा नोकिया फोन विकत घेतला होता आणि तेव्हा जो थरारक प्रसंग आपल्यासोबत घडला याचा खुलासाही अभिनेत्रीनं केला आहे. रतन राजपूत आजही आपल्यासोबत घडलेल्या त्या भयानक घटनेचा विचार करुन हादरते. आपल्या नव्या व्लॉगमध्ये अभिनेत्रीनं सांगितलं की, 'एक दिवस मी मंडी हाऊसमध्ये नाटकाचा सराव करून परतत होते. आणि फोनवर माझ्या आईशी बोलत हते. तेव्हा एक मुलगा आला आणि माझा फोन हिसकावून घेऊ लागला. मी जोरजोरात ओरडू लागले पण कोणीही मला मदत करायलापुढं आलं नाही. लोक फक्त स्तब्ध उभे राहून हा सर्व प्रकार पाहात होते. हा माझ्या आयुष्यातील आणि एकंदरीतच आमच्या कुटुंबातील पहिला फोन होता'. (हे वाचा:Laal Singh Chaddha: आमिरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ, आता पोलिसांत तक्रार दाखल ) अभिनेत्रीनं पुढं सांगितलं, 'मी बराच वेळ मदतीसाठी याचना केली. परंतु कोणीही माझ्या मदतीसाठी धाव घेतली नाही. त्यामुळे मी स्वतः त्या मुलाचा पाठलाग करु लागले. त्या सर्व घटनेदरम्यान मी मुख्य रस्त्यापासून फारच लांब निघून आले होते. मला एक मुलगा भेटला मी त्याच्याकडे मदत मागितली. त्यांनतर तो माझ्या हाताला धरुन मला ओढत एका जंगलात घेऊन जाऊ लागला. आणि तुला तुझा मोबाईल मिळवून देतो चल असं एका वेगळ्याच उद्देशाने म्हणून लागला. मी त्याच्या तावडीतून निसटण्याचा बराच प्रयत्न करत होते. परंतु तो मला फरफटत घेऊन जात होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर दोन व्यक्तींच्या सहाय्याने मी स्वतः चा जीव वाचवून कशीबशी घरी पोहोचले'. असं म्हणत अभिनेत्रीने एकच खळबळ माजवली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या