बबड्याचा ‘अग्गबाई सासूबाई’ला रामराम; आता हा अभिनेता होणार शुभ्राचा पती

बबड्याचा ‘अग्गबाई सासूबाई’ला रामराम; आता हा अभिनेता होणार शुभ्राचा पती

बबड्या ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता आशुतोष पत्कीनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याजागी आता दुसराच अभिनेता बबड्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

  • Share this:

मुंबई 27 फेब्रुवारी : ‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील अभिजीत राजे, आसावरी, शुभ्रा आणि खास करुन बबड्या हे पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झालं. आई आणि बबड्या यांच्या अनोख्या जुगलबंदीचे मिम्स देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले. परंतु बबड्या (Babadya) ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता आशुतोष पत्कीनं (Ashutosh Patki) ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याजागी आता दुसराच अभिनेता बबड्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

अग्गबाई सासूबाई आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या दुसऱ्या सीझनचं नाव ‘अग्गंबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) असं ठेवण्यात आलं आहे. यामध्ये आसावरी हे पात्र निवेदिता सराफ आणि अभिजीत राजे हे पात्र गिरीश ओक साकारणार आहेत. मात्र शूभ्रा हे पात्र तेजश्री प्रधान ऐवजी उमा पेंढारकर साकारणार, तर बबड्यासाठी अभिनेता अद्वैत दादरकर याची निवड करण्यात आली आहे.

झी मराठी वाहिनीनं “तुम्ही कितीही मीटिंगमध्ये असाल, कामात असाल तरी ही नवी कथा चुकवायची नाही.” असं म्हणत एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यामातून या नव्या मालिकेची घोषणा केली. ही मालिका येत्या 15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अवश्य पाहा - शाहिद कपूर साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?; हा निर्माता करतोय चित्रपटाची निर्मिती

‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका आजवर प्रदर्शित झालेल्या इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा बरीच वेगळी आहे. यामध्ये सासू सुनेमधील हेवे दावे न दाखवता दोघी एकमेकांना कसे पाठिंबा देतात हे दाखवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये नेमकं काय दाखवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. नावासोबतच कलाकारांच्या भूमिका देखील बदलणार का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Published by: Mandar Gurav
First published: February 27, 2021, 3:02 PM IST

ताज्या बातम्या