मुंबई, 21 डिसेंबर: 'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहे. प्रेक्षक ‘आसावरी (Nivedita Saraf), अभिजित (Girish Oak), शुभ्रा (Tejashree Pradhan) आणि बबड्या (Ashutosh Patki) ’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. अभिजित सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने करून अभिजित आणि आसावरी घर सोडून निघून जातात आणि आपला एक वेगळा संसार थाटतात, शुभ्राही त्यांना सोहमच्या नकळत मदत करत असते. पण आता जसजशी मालिका पुढे जात आहे तशा मालिकेत खूप घडामोडी घडणार आहेत, ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे.
प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण त्यांना लवकरच अनुभवता येणार आहे कारण त्यांचा आवडता बबड्या आता सुधारणार आहे. कूकिंग स्पर्धेनंतर आसावरी ने केलेल्या भाषणातून सोहमला खूप भरून येतं. आपण चुकलो याची त्याला जाणीव होते आणि तो मनापासून आईची माफी मागतो.
सोहमवर चिडलेली आसावरी सोहम ला माफ करणार का? सोहमला त्याने केलेल्या चुकांची उपरती होणार का? आणि पुन्हा अभिजित - आसावरी परत आपल्या घरी जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या काही दिवसात या मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे.